Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : क्रांती कार्यक्षेत्रात खोडवा ऊस पिकामध्ये सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल आप्पासाहेब जाधव यांचा सत्कार



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

क्रांती कार्यक्षेत्रात खोडवा ऊस पिकामध्ये सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल आप्पासाहेब जाधव यांचा सत्कार

देवराष्ट्रे -
क्रांती सहकारी साखर कारखाना लि. कुंडल याच्या मार्फत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी ऊस विकास योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये एकरी जादा उत्पादन घेनार्या शेतकर्यांचे क्रमांक काढून त्यांना त्यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन यांच्या उपस्थितीत करण्यात येतो.


यावर्षी ऊस विकास योजनेअंतर्गत मागील २०20 - २०21 गळीत हंगामात क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब यशवंत जाधव (आसद) यांनी खोडवा पिकामध्ये एकरी 70 टन एवढे विक्रमी उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यासाठी त्यांचा या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले योग्य नियोजन व क्रांती कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या कर्मचान्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विक्रमी उत्पादन मिळाले. यापुढील काळातही आपण असेच उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव देवराष्ट्रे गट विभागाचे जयकर मुळीक, पी. जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



कारखान्याचे चेअरमन मा. आ. अरुण (आण्णा) लाड, जिल्हा परिषदेचे गटनेते मा.शरद भाऊ (लाड), जिल्हा बँकेचे संचालक मा. किरण लाड यांनी शुभेच्छा दिल्या. या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांती कारखान्याचे चेअरमन मा आ अरुण (आण्णा) लाड, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ एस, एन, जाधव उपप्रादेशिक महा संचालक कोल्हापूर ऊस विकास अधिकारी विलास जाधव, चंद्रकांत गव्हाने, कोरे साहेब, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर , संदेश जाधव,शरद जाधव कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली