SOLAPUR :नदाफ नागरी सहकारी पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन...उत्साहात साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SOLAPUR :नदाफ नागरी सहकारी पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन...उत्साहात साजराSOLAPUR :
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सोलापूर

नदाफ नागरी सहकारी पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन...उत्साहात साजरा


शनिवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभाग्रह या ठिकाणी नदाफ नागरी सहकारी पतसंस्थेचा 22 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


 या प्रसंगी जमियातुल मन्सूर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आरिफभाई मंसुरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


वर्धापन दिनाच्या शुभ दिवशी औचित्य साधत सोलापूर शहरांमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक चेअरमन सलीमभाई नदाफ, व्हाईस चेअरमन अब्दुल सत्तार नदाफ, सेक्रेटरी दाऊदभाई नदाफ,  जॉइंट सेक्रेटरी साकिब नदाफ, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हसिब नदाफ,   जिल्हा महासचिव सरदार नदाफ सर,  यांनी काम पाहिले.तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशवाले शफीभाई इनामदार, दिलीपभाऊ कोल्हे,  नगरसेवक तोफिकभाई शेख, रुग्णसेवक बाबा मिस्त्री,  प्राचार्य्, डॉ ई .जा.तांबोळी, मुख्याध्यापिका सौ.सबिना इंगळगी ,नदाफ नागरी पत संस्थेचे संस्थापक हाजी.के.बी नदाफ,प्रहारजनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख, जमीरभाई शेख, 


  विजापूरचे प्रसिद्ध फिश एक्सपोर्टर ईक्लासभाई सुननेवाले, पीर मोहम्मद मंसुरी, सिकंदर नदाफ,ऑल इंडिया टिपुसुलतान फेडरेशन अध्यक्ष कपगल रसूल, आदी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी नदाफ नागरी पत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी व नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

______________________________________________________

या बातमीचे प्रायोजक आहेत..
महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सांगली.
          www.caroldpart.com


______________________________________________________