SANGLI: महापालिकेत "इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्कायस" दिवस साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: महापालिकेत "इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्कायस" दिवस साजरा




SANGLI: 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सांगली महापालिकेत "इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्कायस" दिवस साजरा



सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP), MoEFCC अंतर्गत, नुकताच "इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्कायस" हा साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.


हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवेचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 


यावेळी आरोग्य, उत्पादकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी स्वच्छ हवेच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवणे, हवामान बदलासारख्या इतर पर्यावरणीय आणि विकासात्मक आव्हानांशी हवेच्या गुणवत्तेचा जवळचा संबंध कसा आहे तसेच याबद्दलची कृती करण्यायोग्य नवीन कल्पना याचा वापर करून हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी माहिती देण्यात आली. 


तसेच माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी मनपा आरोग्यधिकारी डॉ रविंद्र ताटे, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, वरीष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम, कर्मचारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली