SANGLI:अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा निदर्शने : : दोन तास ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI:अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा निदर्शने : : दोन तास ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी



SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा निदर्शने : : दोन तास ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी



अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, दिवाळीपूर्वी भाऊबीज मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी थाळीनाद मोर्चा काढला. जवळपास दोन तास जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून ठिय्या मारला होता. शासनाच्या विरोधात सेविकांनी घोषणाबाजी दिली.


पर्यवेक्षकपदी पदोन्नती द्या • प्रलंबित प्रवास भत्ता तातडीने मिळावा
 केंद्र शासनाची वेतनवाढ व मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने
मिळावी
 • आहार पुरवठ्याची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नये मोबाइल टॅब मिळावेत ..


राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले, जिल्हाध्यक्ष अलका माने, कार्यध्यक्ष विजया जाधव, उपाध्यक्ष रेखा साळुंखे, सचिव नादीरा नदाफ, पलूस कविता शिंदे, निलप्रभा लोंढे, राणी जाधव, माधुरी जोशी, शुभांगी कांबळे, अलका विभुते, अरुण झगडे, मदुमती मोरे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. 


जिल्हा परिषद महिला व
कार्यकारी अधिकारी संदीप यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मागण्याचे निवेदन राज्य शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.


अंगणवाडी सेविका गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही त्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविका मंगळवार, दि. २० सप्टेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली.

त्वरित द्यावी, प्रलंबित प्रवास भत्ता तातडीने मिळावा, अतिरिक्त अंगणवाडीचे काम देऊ नये, आहार पुरवठ्यात सुधारणा करून शिजविण्याची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, ८०० ते १००० लोकसंख्येला एक अंगणवाडी प्रमाण ठेवून जादा लोकसंख्येच्या ठिकाणी नवी अंगणवाडी सुरू करावी, मोबाइल रिचार्ज करण्यासाठी निधी आगाऊ मिळावा अशा मागण्या सेविकांनी केल्या आहेत

अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मराठी भाषेतील पोषण ट्रॅकर अॅप द्यावे, मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर अंगणवाडीत करावे, रिक्त पदे विनाविलंब भरावीत,
अशा सर्व मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले


लोकसंदेश न्यूज  मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली
.