SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
लम्पी चर्मरोग बाधित पशुधनाची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी
सांगली, दि. 16, : लम्पी चर्मरोग बाधित पशुधनास मिरज तालुक्यातील खोतवाडी, नांद्रे येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लम्पी चर्मरोग बाधित पशुधनाची पाहणी करून लम्पी चर्मरोगाची जनावरांमध्ये आढळणारी लक्षणे, त्यावर करावयाचे उपचार याबाबत माहिती दिली. हा आजार लवकर केलेल्या उपचाराने लवकर बरा होत असल्यामुळे बाधित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावी.
अथवा 1962 या पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. लम्पी चर्मरोगाच्या लसीकरणासाठी तसेच बाधित रुग्णांवर करावयाच्या उपचारासाठी लागणारे सेवाशुल्क महाराष्ट्र शासनाने माफ केलेले आहे.
ग्रामपंचायतींनी गोचीड, गोमाशा व इतर कीटक नाशकांची फवारणी नियमितपणे करावी. पशुपालकांनी बाधित जनावरांचे अलगीकरण करावे व जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली