SANGLI: सांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग व वाहतुक नियंत्रण शाखा सांगली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १७.०९.२०२२ रोजी वाहन चालक दिवस साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: सांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग व वाहतुक नियंत्रण शाखा सांगली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १७.०९.२०२२ रोजी वाहन चालक दिवस साजराSANGLI: 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग व वाहतुक नियंत्रण शाखा सांगली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १७.०९.२०२२ रोजी वाहन चालक दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी श्रीमती मनीषा दुबुले मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्री मुकुंद कुलकर्णी प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा सांगली श्री रमेश पाटील मोटार वाहन निरीक्षक सांगली तसेच महेश पाटील उपाध्यक्ष जिल्हा वाहतुक संघटना सांगली, श्री सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मो.प.विभाग सांगली, मो प विभाग सांगली येथील सर्व पोलीस चालक अमलदार याचे उपस्थितीत पोलीस मोटर परिवहन विभाग सांगली येथे यांनी दिनांक १७ सप्टेंबर हा चालक दिवस साजरा केला. त्यामध्ये पोलीस वाहन चालक, रुग्णवाहीका चालक, पेट्रोल वाहतुक चालक, सांगली जिल्हामधील पहिल्या महिला रिक्षा चालक, मालवाहतुक चालक यांना गुणगौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.


आयुष्यात नेहमी उजवं काम कराव म्हणजेच ते कार्य गोड होते परंतु तुम्ही सर्व चालक मित्र आयुष्यभर डाव्या बाजुने म्हणजेच रस्ताच्या डाव्या बाजुने वाहतुकीचे सर्व नियम माळुन, विना अपघात वाहन चालवुन आपला जीवनप्रवास अखंडपणे सुरु ठेवुन अहोरात्र कायदा सुव्यवस्था राखणेकामी सतत पोलीस पेट्रोलींग करुन जनतेच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करता तसेच व्हीआयपी / व्हीव्हीआयपी या दौ-यामध्ये वाहन ताफा चालवितात.


कुणी अवस्थ रुग्णाची ने आण करता, ऑक्सीजनचा वेळेत पुरवठा करता, वेळेवर जीवनाश्यक माल वाहतुक, इंधन पुरवठा अशी महत्वाची कामे अविरतपणे करीत आहात.

कुणी सर्वसामान्य लोकांना रिक्षाव्दारे ने आण करण्याचे काम करतात. आपण देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा घटक असुन आपली अन्यन्यसाधारण भुमिका असुन देशाच्या विकासामध्ये महत्वपुर्ण योगदान वाहन चालक देतात.


यासोबतच सुरक्षितपणे वाहन चालविण्याबाबत श्रीमती मनीषा दुबुले मॅडम अपर पोलीस अधीक्षक सांगली श्री मुकुंद कुलकर्णी प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा सांगली व . श्री रमेश पाटील मोटार वाहन निरीक्षक सांगली यांनी सर्व चालकाना मार्गदर्शन केले. तसेच वाहन चालविताना चालकांचे डोळे अतिशय महत्वाचे असल्याने त्याची डोळे तपासणी डॉ अनिल कुलकर्णी आय हॉस्पीटल मिरज यांच्या वतीने करण्यात आली.


 हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहा.पो.फौ सुनिल राउत वाहतुक शाखा सांगली, सहा.पो.फौ,व्ही पी कोठावळे, शंकर भिंगारदिवे,  राजेंद्र हसबे, अनिल लांडगे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी सुत्रसंचालन केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,

सांगली