मराठी महाराष्ट्राचा मानबिंदू शेखर बापू रणखांबे यांची 'रेखा'...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मराठी महाराष्ट्राचा मानबिंदू शेखर बापू रणखांबे यांची 'रेखा'...




💝 हॅशटॅग "रेखा" 💝

मराठी महाराष्ट्राचा मानबिंदू शेखर बापू रणखांबे यांची 'रेखा'

“रेखा” या रवि जाधव फिल्मस प्रस्तुत शेखर बापु रणखांबे दिग्दर्शित आणि रवि जाधव, मेघना जाधव निर्मित लघुपटाची निवड 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( IFFI, 2022 Goa) झाली आणि मनमयुर थुईथुई नाचू लागला.


...... 'आपली एखादी कलाकृती IFFI (इफ्फी)च्या माध्यमातून जगासमोर यावी,तीच कौतुक व्हावं.यासाठी जीवाचा आटापिटा करणारी;देव पाण्यात बुडवून ठेवणारी,जीव खुंटीला अडकवून ठेवणारी अनेकजण पाहिली होती. परंतु आपला जीव'च एखाद्या कलाकृतीमध्ये ओतून समरस होणं शेखर बापू रणखांबे ह्या कार्यमग्न तरुणांकडे पाहिल्यावर जाणवत राहतं.
संपूर्ण भारतातून निवडक वीसपैकी एकमेव मराठी शॉर्टफिल्म 'रेखा'.




 रेखा म्हणजे मर्यादा,सीमा हे जरी खरं असलं तरी रेखा' म्हणजे अमर्याद आकृती हे पाहिलं आहे. रेखा म्हणजे लावण्य,सौंदर्य, मादकता हे जरी खरं असलं तरी रेखा' म्हणजे जबाबदारी, कर्तव्य, स्वतंत्र बाणा हेही मी अनुभवलं आहे.


सध्या 'दाखवत' फिरण्याचा काळ असतानाही आमचं जगणं कुठंही दाखविण्याच्या लायकीचे नाही, असं स्त्री(मादी)आयुष्य दाखविण्याचा अत्यंत जळजळीत आणि प्रामाणिक यशस्वी प्रयत्न; संवेदनशील असणाऱ्या शेखर बापू रणखांबे यांनी 'रेखा'च्या माध्यमातून केला आहे.
.....शेखर सर आणि संपूर्ण टीम रेखा'चे मनापासून अभिनंदन ।। 😘


'रेखा'चे प्रोडक्टशन हेड म्हणून जबाबदारी पार पाडू शकेल म्हणून विश्वास ठेवलात यासाठी मा.रवि जाधव, मा.मेघना जाधव आणि अर्थातच मा.शेखर बापू रणखांबे आपले आभार...!! 
🌹!..लेखणीपुत्र 🌹
___________________________

     🎀 टीम रेखा 🎀

निर्माते - रवी जाधव, मेघना जाधव.
दिग्दर्शक - शेखर बापू रणखांबे
सहाय्यक दिग्दर्शक - लखन जोतिराम चौधरी, किसन चव्हाण, मुकेश कांबळे, सुचेता इंगळे, विक्रम शिरतोडे, 
प्रोडक्शन हेड - कुलदिप देवकुळे
कलाकार - माया पवार, वैशालि केंदळे, अनुराधा साळुंखे, तमिना पवार, सत्याप्पा मोरे, विशाल शिरतोडे, सागर पाटोळे, जानवी बसूगडे शर्वरी माळी, जानवी कांबळे, पवन सुर्यवंशी, सूरज वाघमोडे, कुलभूषण काटे, निलेश माने,ओजस्वी पवार.गौतम कांबळे
प्रोडक्शन मैनेजर - सचिन ठाणेकर, सुमित साळुंखे. 
मेकअप - मंगेश गायकवाड, 
कॅमेरामन - प्रताप जोशी, 
संकलन  - वैभव जाधव. 
साउंड डिझाइन - मंदार कमलापूरकर, सच्चीदानंद टिकम. पार्श्वसंगीत - मंदार कमलापूरकर, निकिता कुलकर्णी. लोकेशन साउंड- अक्षय लोंढे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली


_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________