MUMBAI : नोटांवरील फोटोवरून राजकारण जोरात,..... ठाकरे गटाने सुचवला ‘हा’ फोटो..... .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : नोटांवरील फोटोवरून राजकारण जोरात,..... ठाकरे गटाने सुचवला ‘हा’ फोटो..... .MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क


नोटांवरील फोटोवरून राजकारण जोरात,.....
ठाकरे गटाने सुचवला ‘हा’ फोटो..... .

मुंबई – देशातील चलनी नोटांवरील फोटोवरून सध्या राजकारण जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.
सर्वात आधी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा,
अशी मागणी केली.
याचे पडसाद देशभरासह राज्यातही उमटत आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा म्हंटले आहे.
त्यांनी महाराजांचा फोटो असलेली एक नोट ट्विटरवर शेअर केली.
ये परफेक्ट है, असं कॅप्शनही त्यांनी फोटोला दिलं.त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी नोटेवर गौतम बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी केली.

तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नेते आणि आमदार अनिल परब यांनी नोटांवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असावा,
अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब म्हणाले की, ‘शिवसेनेने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही.
शिवसेना गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे नोटांच्या राजकारणात या भानगडींमध्ये शिवसेना जात नाही.
पण कुणाचा फोटो असायला पाहिजे, 
असं विचाराल तर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे, 
असं मी सांगेन.
माझा नेता असावा असं प्रत्येकाला वाटत असेल, 
तर मी शिवसेनेचा आहे. मला असं वाटतं बाळासाहेबांचा असायला पाहिजे, 
पण माझ्या वाटण्याला काहीही महत्त्व नाही. 
नोटेवर कुणाचा फोटो असायला पाहिजे, 
हे सरकार ठरवतं.
 हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत,’ 
असं अनिल परब म्हणाले.

दरम्यान, परब यांच्या वक्तव्यावर भा.ज.पा. नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचा फोटो नोटेवर असावा, 
ही सगळ्यांचीच मनोमन इच्छा आहे, 
पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे? 
काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, 
तशी वेळ आली तर पक्ष बंद करेन, 
असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. 
पण तुम्ही बाळासाहेबांचं वचन मोडलत, 
अशी टीका राम कदम यांनी केली.

दरम्यान, नोटांवरील फोटोवरून देशभरात राजकारण सुरु आहे, 
अनेक नेते आपआपली मते मांडत आहेत. 
मात्र या मतांचा विचार करून नोटांवरील फोटोत बदल करण्यात येईल का ?
हे पाहणे महत्वाचे आहे.
________________________________________


      संपादकीय....

जनतेला आपण किती मूर्ख बनवू शकतो याचा प्रत्यय आता नोटेवरील फोटो मधून आलेला आहे..... मोठे मोठे प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना .... महाराष्ट्रातील ...भारतातील... जनतेच्या विषयावर चर्चा न करता .......नोटेवरील फोटो एक विषय आता मोठा गाजतो आहे   ... नोटावर महात्मा गांधी असतील किंवा देव देवता असतील त्याची किंमत कमी किंवा जास्त होणार नाही..... परंतु   .. आपली नोट डॉलर मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत  घसरत असताना या राजकारणी नेत्यांना नोटेवरील फोटोच पडलेल आहे...

जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची डॉलरच्या तुलनेत घसरणारी नोट याचं मूल्यमापन कशी वरच्या स्तरावर जाईल त्याच्यासाठी काय करावं लागेल...उद्योगधंदे, विकास अथवा एखादा प्रगतीचा मार्ग हे राजकारणी कधी सुचवत नाहीत... बोलत नाहीत... पण....

 ....आता जो तो पक्ष आपल्या नेत्याचा फोटो नोटावर येण्यासाठी  प्रयत्न करत आहे ......याची कळ काढली ती  दिल्लीच्या आपचे प्रमुख मुख्यमंत्री केजरीवाल यानी.... कस आहे कोणताही महत्वाचा विषय किंवा एखाद्या प्रश्नापासून भरकटवायच असेल तर असे.... प्रश्न जनतेत ...अस एखादं पिल्लू सोडा.... म्हणजे एकंदरीत सगळे महत्त्वाचे व जनतेच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न बाजूला राहून .....असा प्रश्न चर्चेत येऊन आठ पंधरा दिवसात दिवस खल होईल .....आणि मूळ प्रश्नाला बगल दिली जाईल .... हे पद्धतशीर केलेलं नाटक असतं.... पण आता जनता देखील समजून आहे की हे  कशासाठी चाललेलं आहे ......"समजणे वाले को इशारा काफी है"

सलीम नदाफ : संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           


             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________