BREKING : शामरावनगर मध्ये बालाजी साडी सेंटरला भीषण आग;

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

BREKING : शामरावनगर मध्ये बालाजी साडी सेंटरला भीषण आग;


BREKING : 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

शामरावनगर मध्ये बालाजी साडी सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सतकतेने जीवित हानी टळली.

सांगली शहरातील शामराव नगर येथे जयश्री प्रदीप नलावडे यांच्या घरगुती साडी दुकानला लागली आग 


 बालाजी साडी सेंटरला अचानक लागलेल्या या भीषण आगीत सर्व दुकानाचे व घरातील साहित्य जळून खाक झालेले आहे.. ही आग इतकी भीषण होती की.... याची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.... शामराव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित महापालिका अग्निशामक दलाला कळवून अग्निशमन गाड्या घटनास्थळी बोलावून घेतल्या अग्निशामन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले.. 


या भीषण आगीत साडी सेंटर मधील सर्व साहित्य भस्म झाल्याने लाखो रुपयाचे साड्या व ड्रेस मटेरियल व घरगुती साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज आहे घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्यामुळे या दुकानचे किती नुकसान झाले हे अद्याप कळून आलेले नाही.. या परिसरातील नागरिकांनी  मोठी गर्दी केली होती 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली