MUMBAI : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ 15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम 20 लक्ष

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ 15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम 20 लक्ष




MUMBAI : 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ....
15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत हीआता रक्कम 20 लक्ष रुपये.. .

सांगली, दि. 01: शासनाकडून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या 15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम 20 लक्ष रु इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात वनविभागाच्या माध्यमातनू उत्तम पध्दतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरु असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.




 मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने वनालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्यात येत असून डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षात अनुक्रमे 4 लाख 78 हजार 86 इतकी मनुष्यहानी झाली आहे.


 मनुष्यहानी झालेल्या व्यक्तींच्या अवलंबित कुटुंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा व हत्ती यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मनुष्यहानीमुळे देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमे वाढ करण्यात आली असून यापुढे 15 लक्ष रुपये ऐवजी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 10 लक्ष रुपये तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लक्ष त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम स्वरुपात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



व्यक्ती कायम अपंग झाल्यास रु 5 लक्ष तर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास रु 1 लक्ष 25 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा 20 हजार रुपये प्रति व्यक्ती इतकी राहणार आहे.


वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यु झाल्यास देण्यात येणाऱ्या ६० हजार रू. इतक्या रकमेत वाढ करून ती ७० हजार रू. इतकी करण्यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यु झाल्यास देण्यात येणाऱ्या १० हजार रू. इतक्या रकमेत वाढ करून १५ हजार रू. इतकी करण्यात आली आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास देण्यात येणारी १२ हजार रू. इतकी रक्कम वाढवून १५ हजार रू. करण्यात आली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी ४ हजार रू. ची रक्कम वाढवून ५ हजार रू. इतकी करण्यात आली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________