SANGLI.. सांगली अंजनी गावचे सुपुत्र डॉ .संतोष पाटील यांची लेफ्टनंट पदी अभिनंदनिय निवड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI.. सांगली अंजनी गावचे सुपुत्र डॉ .संतोष पाटील यांची लेफ्टनंट पदी अभिनंदनिय निवडSANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली अंजनी गावचे सुपुत्र प्रा.डॉ .संतोष पाटील यांची लेफ्टनंटपदी अभिनंदनिय निवड.....

पाटण प्रतिनिधी: अंजनी गावचे सुपुत्र व बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण मधील भूगोलशास्त्र विभागातील सहाय्यक प्रा.डॉ संतोष प्रकाश पाटील यांची भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट या ( *राजपत्रितअधिकारी गट *अ* ) पदी निवड करण्यात आली.ही निवड राष्ट्रीय कॅडेट कोर ,ऑफिसर ट्रेनिंग अकादमी नागपूर चे कमांडिंग ऑफिसर, मेजर जनरल कुलदीप जितसिंग राठोड ,बिग्रेडीयर  हिरन देसाई , लेफ्टनंट कर्नल गिरीश दत्त,  मेजर शैलेंद्र वर्मा ,मेजर अंकित मदन, मेजर सौरभ तिवारी  ,या  नॅशनल कॅडेट कोअर ,ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी नागपूर टीमने दिनांक २२ऑक्टोबर २०२२ रोजी निवड करण्यात आली .
यापूर्वी  डॉ पाटील यांची २०२१ मध्ये मुख्य मुलाखत पुणे या ठिकाणी यशस्वी झाली होती .यानंतर ऑफिसर ट्रेनिंग अकादमी नागपूर या ठिकाणी तीन महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज त्यांची लेफ्टनंट पदी निवड करण्यात आली .या प्रशिक्षणामध्ये शारीरिक ,मानसिक व बौद्धिक या तिन्ही चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर  अंतिम गुणवत्ता यादी मध्ये त्यांची   निवड करण्यात आली.या प्रशिक्षणामध्ये   ड्रिल ,मॅप रीडिंग, फायरिंग ,बौद्धिक परीक्षा , शारीरिक चाचणी  यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांचाच अंतिम यादीमध्ये समावेश होतो  .यामध्ये शंभर मीटर धावणे, फायरिंग यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे .


नॅशनल कॅडेट कोर  ,ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी नागपूर (OTA )ही नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी( NDA )व   इंडियन मिलिटरी अॅकॅडमी डेहराडून  (IMA)ला समकक्ष अकॅडमी असून देशभरातील ऑफिसर तयार करणारी  एकमेव संस्था आहे  .या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून ७५० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता .दिल्ली ,चेन्नई ,कोलकाता ,जम्मू काश्मीर, आसाम ,मणिपूर तामिळनाडू, कर्नाटक ,केरळ या राज्यातील  प्राध्यापकांपैकी एक १७१ जणांची अंतिम यादीत निवड करण्यात आली  .यामध्ये अंजनीसारख्या ग्रामीण भागातील युवकांनी सर्वोत्कृष्ट NCC ऑफिसरचा पुरस्कार मिळविल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

तासगाव तालुक्याच्या पूर्व टोकाकडील अग्रनी नदीच्या काठावर वसलेलं छोटसं गाव म्हणजे अंजनी होय.या गावाची ओळख म्हणजे स्वर्गीय आर.आर. आबा यांचे गाव पण त्याच प्रमाणे इंजिनियर निर्माण करणारे गाव..स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध अधिकारी घडविणारे गाव..देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे गाव ..ज्ञानदान करणारे शिक्षक, प्राध्यापक तयार करणारे गाव आदर्श शेती बरोबरच राजकारण व समाजकारणात अग्रेसर असणारे गाव म्हणून अंजनी गावची ओळख आहे.आणि याच अंजनी गावचे सुपुत्र प्रा.संतोष प्रकाश पाटील   यांची आज लेफ्टनंटपदी निवड झाल्यामुळे   अंजनी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.


प्रा.संतोष पाटील यांची लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल   माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण,उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, संचालक संजीवदादा चव्हाण, याज्ञसेन पाटणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, अधीक्षक विजय काटे,यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग यांनी अभिनंदन केले तसेच  व कमांडिंग ऑफिसर १९ महारष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड चे कर्नल जे.पी. सप्तगिरी,  व अॅडम ऑफिसर कर्नल दिनेश कुमार झा  यांनी विशेष अभिनंदन केले

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
 सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
                        www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________