KOLHAPUR : कुंभोज येथे चार मेगावाँट सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ, शेतकऱ्यांना होणार 24तास शेतीसाठी वीजपुरवठा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : कुंभोज येथे चार मेगावाँट सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ, शेतकऱ्यांना होणार 24तास शेतीसाठी वीजपुरवठा
KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

कुंभोज येथे चार मेगावाँट सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ, शेतकऱ्यांना होणार 24तास शेतीसाठी वीजपुरवठा....

राज्यातला महत्त्वकांक्षी प्रकल्प "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत कुंभोज येथे 4 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम लवकरच चालू करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कूंभोज व लगतच्या नागरिकांना सर्व ग्रामस्थांना शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा बारा तास वीज उपलब्ध होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा शुभारंभ कुंभोज गट क्र. 1716 (गायरान क्षेत्र) येथे आयोजित करण्यात आला होता. या शुभारंभ सरपंच अरुणादेवी पाटील,उपसंरपच अनिकेत चौगुले यांचे हस्ते करण्यात आला.

               यावेळी गटनेते किरण माळी म्हणाले कि सदर सौरऊर्जा प्रकल्प मुळे कुभोज गावाला बारातास 4मेगावाँट वीज उपलब्ध होणार आहे.त्यामुळे शेतीसाठी बारातास वीज उपलब्ध होणार असुन शेतकऱ्यांना यांचा मोठा लाभ होणार आहे.सदर प्रकल्प मंजुरीसाठी बौध्द समाजाचे मोलाचे योगदान आहे.सदर प्रकल्प लवकरात लवकर चालू झालेस उन्हाळ्यात शेतकरी वगाची अनेक समस्या मिटणार असुन,कुंभोज सुजलाम सुफलाम होईल,यावेळी माजी संरपच प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


          यावेळी महाविकास आघाडी गटनेते किरण माळी,प्रकाश पाटिल,किरण नामे,ग्रामपंचायत सदस्य अशोक आरगे,भरत भोकरे,लखन भोसले,सुदशन चौगुले,सदाशिव महापुरे,आप्पासाहेब पाटिल,अजित देवमोरे,अमर बंडगर,विनायक पोतदार,बंड्ड कत्ते,महानिर्मिती अधिकारी ,EESL अधिकारी व इतर मान्यवर उपस्थिती होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली