SANGLI
जत प्रतिनिधी इब्राहिम शेख
जत तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष पंचनामा करून झालेल्या नुकसानीचे त्वरित भरपाई द्या
महाविकास आघाडीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
महाविकास आघाडी मार्फत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी जत मध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या पुढील मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन दिले
1) गेल्या काही दिवसात परतीच्या मान्सूनमुळे व बिगर मोसमी पावसामुळे जत तालुक्यात व संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमुग, बाजरी, मुग, उडीद इत्यादी पिक ऐन काढणी वेळी अतिवृष्टी झाल्याने पिकांच्या दाण्यात कोंब उठ्न व कुजून पूर्णपणे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जत तालुक्यातील खरीप हंगमातील अतिवृष्टीमुळे हाताशी येणारा घास हिरावून घेतला आहे. यापुढे रब्बी हंगामातील घेण्यात येणारे ज्वारी, हरभरा, मका आदि पिक घेण्यासाठी पिकाऊ क्षेत्रात अत्यंत मोठ्या प्रमाणत पाणी साचून व गवत उगवल्याने कोणतीही मशागत करणे शक्य नाही. त्यामुळे रब्बी हंगाम सुद्धा वाया जाणार आहे. त्यामुळे खरीप पिके हातालाही लागलेले नाही व रब्बी हंगामातील पिके घेणे अशक्य आहे. त्यामुळे हे वर्ष संपूर्ण वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याने शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे.
2) जत तालुक्यामधील फळबागा प्रामुख्याने द्राक्षे, डाळिंब, सीताफळ ड्रगन फ्रुट या सर्व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
3) बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याची जमीन वाहून जाणे. माती वाहून जाणे या सारखे प्रकार झालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. वरील नुकसान भरून येण्यासाठी खालील प्रमाणे योजना करणेत यावी.
४. महाराष्ट्रातील व जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची दोन्ही हंगामातील पिके हातातून निघून गेल्याने त्यांना जगण्यासाठी मोफत अन्नधान्याचा पुरवठा त्वरित सुरु करावा. तरी या लाक्षणिक उपोषण वेळे पुढील प्रमाणे*उपाय योजना* कराव्यात यासाठी निवेदन दिले
1) त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व सोई सुविधा लागू कराव्यात 2 ) शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारची कमीत कमी मदत मिळावी व सर्व पिकांचे नुकसानीचे पंचनामे व्हावेत. या संकटातून शेतकरी पुन्हा सक्षमपणे उभा राहिला पाहिजे याकरिता केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने त्वरीत मदत करावी.
वरील सर्व मागण्यांचे निवेदन घेऊन मागण्या मान्य करण्याकरिता महाविकास आघाडीचे घटक पक्ष . राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते शेतकन्यावर प्रेम करणारे सर्व शेतकरी संघटना यांच्या वतीने जत तहसीलदार कार्यालय कार्यालयावर २७ ऑक्टोंबर २०२२ रोजी स. ११.०० रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी याची नोंद घ्यावी.असा इशारा दिला आहे
या लाक्षणिक उपोषण वेळी आमदार विक्रमसिंह सावंत,काँग्रेस अध्यक्ष अप्पराया बिराजदार, शिवसेना तालुका अध्यक्ष संजीव कुमार सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय कांबळे ,काँग्रेस कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश माळी, सुनील बागडे ,आकाश बनसोडे, दिनेश जाधव ,अमित दुधाळ, सिद्धना शिरसाड,सागर शिनगारे ,बाबासाहेब कोडग, नागनाथ मोटे, संतोष कोळी, संतोष कांबळे ,आदि निवेदनावर सह्या करून निवेदन देण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
_________________________________________________________________