BID: नुकसानीची पाहणी करायला गेलेले सत्तार म्हणतात... कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का ?... व्वा रे कृषीमंत्री .......!

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

BID: नुकसानीची पाहणी करायला गेलेले सत्तार म्हणतात... कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का ?... व्वा रे कृषीमंत्री .......!
BID
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

नुकसानीची पाहणी करायला गेलेले सत्तार म्हणतात...
कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का ?...
व्वा रे कृषीमंत्री .......!

बीड : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
अब्दुल सत्तार यांचा बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असतानाचा एक व्हि.डि.ओ. समोर आला आहे.
अब्दुल सत्तार यांनी थेट बीडमध्ये पाहणी दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का?
असा प्रश्न विचारला.यामुळं सत्तार पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.
विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरुन टीका केली आहे. सत्तार यांच्या वक्तव्यानं थेट कृषीमंत्र्यांनाच शेतकऱ्यांच्या दु:खाचा विसर पडला का ?
असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अब्दुल सत्तारांचा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर राज्यातील शेतकरी परतीच्या पावसानं संकटात सापडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून ट्विटवर ट्रेंड देखील चालवला.
एकीकडे आदित्य ठाकरे देखील शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत आहेत. 


मात्र, यावेळीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं असंवेदनशीलपणा दाखवणारं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
 अब्दुल सत्तार परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा मारताना समोर आलं आहे. 
अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का ?, 
असं विचारलं. 
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कधी कधी थोडी घेतो,
 असं उत्तर दिलं आहे. 

शेतकऱ्यांच्या दु:खाचा विसर शेतीच्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या अब्दुल सत्तारांचा दारु संदर्भातील प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचं उत्तर यामुळं मंत्री आणि अधिकाऱ्यांना परतीच्या पावसानं संकट ओढावलेल्या शेतकऱ्याच्या दुःखाचा विसर पडल्याचं दिसून आलं. 
अब्दुल सत्तार यांचं हे वक्तव्य म्हणजे परतीच्या पावसानं होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं म्हणत त्यांच्या विरोधात बीडमध्ये संताप व्यक्त करण्यत आला.

 अतिवृष्टीच्या दौऱ्यानंतर अब्दुल सत्तार यांची जिल्हाधिकारी यांना दारू पिता का ?
 असा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचं उत्तर असणारी व्हि.डि.ओ. क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
व्हायरल व्हि.डि.ओ. क्लिपने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. 


व्हायरल व्हि.डि.ओ. क्लिप मुळे अब्दुल सत्तार ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. 
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्या व्हि.डि.ओ. क्लिपवर संताप व्यक्त केला आहे. हे खोके सरकार आता झिंगझिंगाट सरकार झाल्याचा आरोप कायंदे यांनी केला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली


_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________