SHIRDI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
शिर्डीच्या साईचरणी भरभरुन दान, वर्षभरात 398 कोटी रुपये अर्पण.....
अहमदनगर: मागील वर्षी गुढीपाडव्याला राज्यातील प्रार्थनास्थळे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाल्यावर भक्तांनीसुद्धा देवाच्या दर्शनाला पसंती दिल्याचं दिसून आलं. कोव्हिड निर्बंध शिथिल झाल्यानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मागील 13 महिन्यांत साईबाबांच्या झोळीत विक्रमी दान केल्याचं दिसून आलं. गेल्या 13 महिन्यांत तब्बल 398 कोटी रूपयांचे दान संस्थानला प्राप्त झालं आहे. कोरोना काळात मात्र हेच दान अवघे 92 कोटींच्या घरात होते.
देशात कोरोना आल्यानंतर राज्यातील धार्मिक स्थळ बंद झाली होती. देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साई मंदिर याच काळात तब्बल दीड वर्षे बंद होते. मात्र मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याला धार्मिक स्थळे निर्बंधासह दर्शनाला सुरू केल्यानंतर साईंच्या मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली. मागील 13 महिन्यांत विविध निर्बंध हटविल्यानंतर तब्बल दीड कोटी भाविकांनी दर्शनाला हजेरी लावली.
गेल्या वर्षभरात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या झोळीत भरभरून दान अर्पण केलं आहे. कोविड काळानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या 13 महिन्यात तब्बल 398 कोटी रूपये विविध माध्यमातून साईबाबांना दान दिले असून यात 27 किलो सोन तर 356 किलो चांदीचाही समावेश आहे.
साईभक्तांनी दिलेल्या दानातून भक्तांना सोयी सुविधा पुरविण्यात येत असून राज्यातील अनेक सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रीय आपत्तीत साईबाबा संस्थान मदत करत असल्याची प्रतिक्रिया साईबाबा संस्थानाच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायात यांनी दिली.
मागील आठवड्यात अनेक निर्बंध संस्थानने हटवले असून साईबाबांच्या समाधीसह द्वारकामाई, गुरुस्थानच दर्शन अधिक सुखकर होण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. साईबाबा संस्थानच्या 2500 कोटींच्या विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी असून 485 किलो सोने तर 6 हजार 40 किलो चांदी संस्थांनकडे आहे.
7 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2022 या काळातील दान
दानपेटीत मिळाले - 169 कोटी.
देणगी कांऊटर -78 कोटी.
ऑनलाईन डोनेशन - 73 कोटी 54 लाख.
चेक आणी डिडी - 19 कोटी 68 लाख.
डेबिट क्रेडिट कार्ड - 42 कोटी.
मनिऑर्डर - 2 कोटी 29 लाख रूपये.
सोने - 27 किलो ( 12 कोटी 55 लाख )
चांदी - 356 किलो ( 1 कोटी 68 लाख )
- सन 2019 -20 - 290 कोटी दान
- सन 2020 -21 - 92 कोटी दान ( कोरोना काळात )
- सन 2021 -22 - 398 कोटी दान...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________