SANGLI : सालाबाद प्रमाणे मिरजेत दि.20-11-2022 रोजी महान देशभक्त स्वातंत्रसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त *क्रांती ज्योत*.भव्य मिरवणूक....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : सालाबाद प्रमाणे मिरजेत दि.20-11-2022 रोजी महान देशभक्त स्वातंत्रसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त *क्रांती ज्योत*.भव्य मिरवणूक....SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी मिरज.

सालाबाद प्रमाणे मिरजेत दि.20-11-2022
रोजी महान देशभक्त स्वातंत्रसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त *क्रांती ज्योत* भव्य मिरवणूक


क्रांतीज्योत मिरवणूक किसान चौक येथुन ठीक सकाळी 11 वाजता सुरु होउन ह.मिरासाहेब दर्गा मार्ग स्वर्गीय अहमदबाशा चौक (अमर टॉकीज) येथे ह.टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमासाठी मराठा महासंघाचे विलास देसाई पलूस पंचायत समितीचे माजी सभापती विजय कांबळे,जिजाऊ चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक सांगली जिल्हा अध्यक्ष धनंजय भिसे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे योगेंद्र कांबळे,शिवसेनेचे सागर मेटकरी सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे अशी माहिती हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांनी दिलीतरी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन हजर टिपू सुलतान जयंती महत्सव समिती मिरजेचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांनी केले आहे.


या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे,शिवसेनेचे सागर मेटकरी यासीन जमादार,सलीम कनवाडे, मुस्तफा रोहिले,शरीफ मुजावर सात गवंडी जमीर शेख,शाबास सय्यद,नासिर शेख,जुबेर यरगट्टी हुसेन सय्यद,इरफान गाडद, शाहिद पटेल,मुन्ना गाडद आदी समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली