गुटखा पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुटखा पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई


लोकसंदेश न्यूज नेटवर्क

गुटखा पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई


सांगली, दि. 02, राज्यात स्वादिष्ट, सुगंधित किंवा कोणत्याही अपमिश्रकासोबत मिसळली जाते आणि अन्य नावाने चालणारी किंवा गुटखा पानमसाला / सुगंधित सुपारी/ सुगंधित तंबाखू/ खर्रा व मावा इत्यादी पदार्थांच्या विक्री/साठा/उत्पादन/ वितरण करण्यास प्रतिबंध असून या आदेशाचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने गुटखा पानमसाला / सुगंधित सुपारी/ सुगंधित तंबाखू/खर्रा व मावा यांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने  या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभामार्फत छापे टाकून पदार्थाचे साठे जप्त करण्यात आले आहेत.  तसेच  संबंधिताविरुध्द भारतीय दंडविधान कायदा अंतर्गत कलम १८८ २७२ २७३३२८ नुसार व अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५९ नुसार पोलिसांच्याकडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी  माहिती सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन        सु. आ. चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


कुशल वसंतराव खंडागळे विक्रेता आणि मालक में मातोश्री पान शॉप, यल्लमा चौक, इस्लामपूर, ता वाळवा यांचे ताब्यातून पानमसाला व सुगंधित तंबाखू इ. वजन २९६ कि.ग्रॅ चा साठा किमत रु ७०४७५/- इतका जप्त करण्यात आला आहे. व त्यांचेविरुध्द भा.द.वि कलम १८८, २७१, २७३ व ३२८ सह कलम अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ७९ नुसार संबंधित पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पेढी सील करण्यात आली असून पेढीमालक यांना पोलीस कस्टडीत ठेवले होते. अल्फाज निसार तांबोळी, विक्रेता आणि मालक में आजाद पान शॉप, मोमीन मोहल्ला, इस्लामपूर, ता वाळवा यांचे ताव्यातून पानमसाला व सुगंधित तवाखु छ. वजन १.७४ कि ये चा साठा किंमत रु. ६०१५/- इतका जप्त करण्यात आला आहे. व त्यांचेविरुद्ध भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८. सह कलम अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५९ नुसार संबंधित पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे



 व पेढी सील करण्यात आली असून पेटीमालक यांना पोलीस कस्टडीत ठेवले होते. फैजुलहक हारून दिवाण, विक्रेता आणि मालक मे रॉयल पान शॉप, मोमीन मोहल्ला, इस्लामपूर, ता वाळवा याचे ताव्यातून पानमसाला व सुगंधित तंबाखू इ. वजन ०.८०२ कि.ग्रॅ. चा साठा किंमत रु. १६४७/- इतका जप्त करण्यात आला आहे. व त्यांचेविरुद्ध भा.द.वि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह कलम अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५९ नुसार संबंधित पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पेढी सील करण्यात आली असून पेढीमालक यांना पोलीस कस्टडीत ठेवले होते. त्यांच्या पेढीचे नोंदणी प्रमाणपत्र रदद करण्यात आले आहे.



 विजय तुकाराम चव्हाण, विक्रेता आणि भागीदार ए जी पान शॉप, कासेगाव, ता वाळवा यांचे ताब्यातून पानमसाला व सुगंधित तंबाखू है. वजन १०.१८७ कि.ग्रॅ. चा साठा किंमत रु. १६३७४ इतका जप्त करण्यात आला आहे. व त्यांचेविरुध्द भा.द.वि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह कलम अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ७९ नुसार संबंधित पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पेढी सील करण्यात आली असून पेटीमालक यांना पोलीस कस्टडीत ठेवले होते त्यांच्या पेढीचे नोंदणी प्रमाणपत्र रदद करण्यात आले आहे. वरील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी च.रा. स्वामी, द.ह. कोली व नमुना सहायक ता. कु कवळे यांनी घेतलेली आहे.

गुटखा पानमसाला / सुगंधित सुपारी/सुगंधित तंबाखू / खर्रा व मावा व तत्सम पदार्थ याचा साठा/विकी / वितरण व उत्पादन करण्यात येवू नये, असे करताना आढळल्यास ज्याच्यकडे असा साठा आढळुन येईल त्यांचेविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले प्रतिबंधित पदार्थाची  विकी/ साठा/ वितरण व उत्पादन करताना निर्दशनास आल्यास दुरध्वनी कमांक: ०२३३-२६०२२०१ व टोल फ्री नं १८००२२२३६५ वर माहिती देण्यात यावी. तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले कळविले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD 



संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com                  __________________________________________________________________