संविधान दिन उत्साहात साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संविधान दिन उत्साहात साजराSANGLI
लोकसंदेश न्यूज़ नेटवर्क

                       संविधान दिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 26,  : संविधान ‍दिनानिमित्त एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य खुशाल गायकवाड, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशोक पवार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी सामुहिक संविधान वाचन करून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली.  ही संविधान रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस.टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी स्टेशन चौक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री कै. पंडीत नेहरू व माजी मुख्यमंत्री कै. डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


संविधान रॅलीमध्ये सिटी हायस्कूल सांगली व राणी सरस्वती कन्या शाळेचे शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला.  या कार्यक्रमास अरुण आठवले,  नितीन गोंधळे, उत्तम कांबळे, विठ्ठलराव काळे, बापूसाहेब सोनवणे, संतोष वाघमारे, प्रियानंद कांबळे, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा परिषद समाज कल्याण,  जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD.

MUMBAI.


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन  सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________


लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई, सांगली