शेरीनाल्यातील सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीमध्ये......नागरिकांच्या जीवाशी खेळत.... सांगलीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालणारा मोठा घोटाळा.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेरीनाल्यातील सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीमध्ये......नागरिकांच्या जीवाशी खेळत.... सांगलीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालणारा मोठा घोटाळा.....
सांगलीतील प्रसिद्ध
शेरीनाल्यातील सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे....

आणि हे पाणी सांगलीकरांना पिण्याच्या पाण्याच्या जॅकवेल जवळच मिसळत असल्यामुळे सांगलीमध्ये रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही....


या शेरीनाला फोडण्यामागे बरेच राजकारण असल्याचे कळून येते ... काही आरोग्य विषयक डॉक्टर व मेडिकलवाले, व बिसलेरी सारख्या बाटली बंद पाणी
पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्या
यांची सुपारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महापालिकेने घेतल्यामुळे हा शेरीनाला वारंवार फूटतो असं नागरिकांचे मत आहे.. . ही सुपारी कोट्यावधीची असल्याचे कळून येते .....नदीच्या प्रदूषणाबरोबर सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर उपाययोजना करावी . .अन्यथा याच सांडपाण्याने मनपा व प्रदूषणच्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालू असा इशारा नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.

ते म्हणाले, कित्येक वर्षापासून शेरीनाल्याचा प्रश्न कायम आहे. पाण्यावर प्रक्रिया करुन ते धुळगाव. येथे नेण्यासाठी योजना राबविण्यात आली. मात्र कोट्यवधींचा खर्च करुनही शेरीनाल्यातील सांडपाणी ..कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. वारंवार असे प्रकार होत आहेत.


तक्रार केल्यानंतर जुजबी उपाययोजना केल्या जातात. पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. याशिवाय सांगलीकरांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. महापालिका प्रशासन याकडे गांभिर्याने पहायला तयार नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली असता केवळ नोटीस बजाविण्याचे काम केले जाते, त्यामुळे या सर्व संबंधितांना सांडपाण्याने आंघोळ घालनार असल्याचेही त्यांनी सांगितले .

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________________

या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या


www.nisargbhumi.com

8830247886

____________________________________________________________________________________