बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
सदर अर्जाची एक प्रत दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली या कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य खुशाल गायकवाड यांनी केले आहे.
परंतु हा एक सर्व फार्सच आहे.... गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थी समाज कल्याण ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक मिळते... हे आम्ही स्वतः अनुभवलेल आहे ....त्या ठिकाणी जे अधिकारी बसलेले आहेत ते पैशाशिवाय काहीही बोलत नाहीत.... त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हेलपाटे आणि त्रुटी याच्यामध्ये त्यांचे अर्ज बाजूला केले जातात.... ज्यांनी पैसे दिले त्यांचे अर्ज त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जातात ... शासन सर्व जाती-धर्मासाठी विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चांगल्या योजना आणतच असते... परंतु मागासवर्गीय समाज कल्याण खाते पैशाशिवाय काहीही बोलत नाही ... ....माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.... विद्यार्थ्यांचे हेलपाट्यामुळे अक्षरशः विद्यार्थी व त्यांचे पालक देखील हेलपाटे मारून रडकुंडीला येतात.. हे कार्यालय कुणाचही काम पैसे घेतल्याशिवाय करत नाही... (त्यांच्याकडे त्रुटी काढण्याच्या बऱ्याच पळवाटा उपलब्ध आहेत) ही आम्ही जाणीव पूर्वक आपणास कळवित आहोत .... या अधिकाऱ्यांवर याच्यावर गंभीर इलाज करून या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देणे द्याव्यात.... व गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कसा दिलासा मिळेल त्यांना विनासायास सर्टिफिकेट मिळेल याची सोय करावी...
या विद्यार्थ्यांच्या साठी प्रत्येक महिन्यात मेळावा घेऊन विद्यार्थ्यांनी केलेले अर्जाचे व त्यांच्या सर्टिफिकेटचे वाटप त्या मेळाव्यात जर केले तर या भ्रष्टाचाराला बऱ्यापैकी आळा बसण्याची शक्यता आहे
.तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे जातीने लक्ष देऊन... गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही सर्टिफिकेट्स ऑनलाईन कशी मिळतील... याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे....अन्यथा नेहमी प्रमाणे हा असाच एक फार्स होऊन जाईल...
आपला,
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली.
8830247886
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली