SANGLI
लोकसंदेश न्यूज़ प्रतिनिधि
पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यास राज्यपाल कोशारीच्या धोतरात विषारी साप सोडणार......राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
म्हातार्याला लागलेया चळ या म्हणी प्रमाणे, या वयात फाजील वक्तव्य करणारे, महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करताना आनंदाच्या उकळ्या फुटणारा, आपण राज्यपाल नाहीच हे विसरणारे, सुपारी बहाद्दर, पाली सारखा विषारी वाटणारा, व्यवसायाने मुनीजी दिसणारा, वाचाळवीर, आंबटशौकीन, महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल भगतसिंग कोशारी महाराष्ट्राचा राज्यपाल झाल्यापासून आमचे व महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणून बुजून अपमान होईल असे वक्तव्य करीत आहेत .तसेच अनेक वेळा महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांच्या विषयी त्यांचा आपमान होईल असे वक्तव्य करत असताना दिसत आहे ,परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून त्यांचा अपमान होईल असं वक्तव्य करीत असताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाचा अपमान होईल असेच वागत आहेत असे दिसत आहेत .या पुढील काळात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या विषयी जर बेताल वक्तव्य केली तर मुंबई येथे असणाऱ्या राजभवन येथे जाऊन किंवा त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घुसून त्यांच्या धोतरात विषारी साप सोडण्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये इशारा दिला.
लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई,सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________