SATARA
नसरुद्दीन नदाफ लोकसंदेश प्रतिनिधी
महानिर्मितीचा कलावंत विशाल बळवंत जाधव....
महानिर्मितीच्या कोयना जल विद्युत केंद्र पोफळी (अलोरे टप्पा-३) वर्धापन दिनानिमित्त सलग २१ दिवस अथक मेहनत घेऊन श्री. विशाल बळवंत जाधव, तंत्रज्ञ-३ यांनी छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचा ७८२५ खिळे आणी १५० ग्रॅम धागा यांच्या सहाय्याने तयार केलेली "थ्रेड स्ट्रिंग  आर्ट" ही कलाकृती प्रत्येकासाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरली.  त्यांनी Thread Art  ही कला सन २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकली. त्यानंतर अलोरे पॉवर हाउसच्या २०१९ च्या वर्धापन दिनासाठी  प्रथमच त्यांनी "महानिर्मिती लोगो" थ्रेड आर्ट ने तयार केला होता
 आणि यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम  कलाकृती साकारली. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, कलेची विलक्षण आवड आणि खडतर परिश्रम हे स्वभाव गुण असले तरी महाराजांची  ही कलाकृती हुबेहूब साकारताना ज्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्यांचे आभार मानायला श्री.जाधव विसरले नाहीत हे विशेष.
या कलाकृतीतून मिळालेल्या शुभेच्छा आणि विश्वासातून भविष्यात अधिक वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. श्री. विशाल जाधव यांच्या या अभिनव कलाप्रवासाला टीम महानिर्मितीच्या खूपखूप  शुभेच्छा...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली


