Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा येथील.व्हि. एम न्यूज चे संपादक , मालक सादिकभाई शेख व ओ.बी.सी. संघटनेचे प्रमुख पुणे येथील झाकीर भाई शिकलगार यांनी आज सांगली येथे लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसला दिली भेट...SANGLI

सातारा येथील व्ही.एम. न्यूज चे संपादक मालक सादिकभाई शेख व ओ.बी.सी. संघटनेचे प्रमुख पुणे येथील झाकीरभाई शिकलगार यांनी आज सांगली येथे लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसला दिली भेट...


सातारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रिय व्ही. एम. टी. व्हीं. न्यूजचे संपादक ,मालक आणि मा.उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक श्रीयुत सादिकभाई शेख व ओबीसी संघटनेचे झाकीरभाई शिकलगार यांनी आज लोकसंदेश न्यूज मीडिया चे सांगली ऑफिसला भेट दिली..

यावेळी लोकसंदेश न्यूज चे संपादक सलीमभाई नदाफ यांनी सर्वांचे स्वागत केले....


या प्रसंगी बोलताना व्ही. एम. न्यूजचे सादिकभाई
म्हणाले की, लोकसंदेश न्यूजचे अल्पावधीत "लोकसंदेश न्यूज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी " मध्ये रूपांतरित झाले आहे,संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित होणाऱ्या लोकसंदेशच्या नऊ वर्षांतील सातत्य, प्रगतीकडे पाहून भविष्यात ही मीडिया कंपनी फार मोठी भरारी घेणार असल्याचे यावेळी आपले मत व्यक्त केले..


ते पुढे म्हणाले की,
लोकसंदेश मीडियाने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवलेली आहे,फक्त समाचारपत्र व चॅनल आणि पोर्टलवर न राहता आता ही कंपनी, जाहिरात क्षेत्रात रोड होर्डिंग, बस ऍडव्हर्टाईजमेंट, व वॉल ऍडव्हर्टाइजमेंट, आदी मध्ये या कंपनीने प्रगती केली असल्याचे सांगून त्यांनी या कंपनीचे कौतुक केले..
व्ही .एम. न्यूज च्या माध्यमातून एक मीडिया सहकारी म्हणून सातारा व कोकणमध्ये लोकसंदेश मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रगतीसाठी आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले...


लोकसंदेशच्या लोकप्रिय दिवाळी अंकाचे बाबतीत आपले मत व्यक्त करताना म्हणाले की ,आजच्या या महागाईच्या काळामध्ये दिवाळी अंक छापणे आता इतके सोपे राहिलेले नाही, परंतु लोकसंदेश न्यूज ने "ना नफा" "ना तोटा" तत्वावर दिवाळी अंक प्रसारित करून या स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे

भविष्यामध्ये व्ही.एम.न्यूज व लोकसंदेश न्यूज यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकत्रितपणे काम करण्याची इच्छा त्यांनी संपादक, सलीमभाई नदाफ यांच्याकडे व्यक्त केली.

ओबीसी संघटना प्रमुख पुण्याचे झाकीरभाई शिकलगार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ओ.बी.सी. संघटनेच्या माध्यमातून लोकसंदेश न्यूज साठी  सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले .. 

सादिकभाई शेख यांच्या समवेत ओ.बी.सी. संघटनेचे झाकीरभाई शिकलगार,लालूभाई, विनायक पानसे,कडेगावचे पत्रकार समीर तांबोळी, वैभव कदम,नेक्स्ट व्हिजन कंपनीचे अकबर सय्यद ,लोकसंदेश मॅनेजर सुयोग वेल्हाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली