सीईओ जितेंद्र डूडी ( IAS) साहेब यांचे काम अभिमानास्पद - जिल्हाध्यक्ष अमोल माने

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सीईओ जितेंद्र डूडी ( IAS) साहेब यांचे काम अभिमानास्पद - जिल्हाध्यक्ष अमोल माने



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सीईओ जितेंद्र डूडी ( IAS) साहेब यांचे काम अभिमानास्पद - जिल्हाध्यक्ष अमोल माने

मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा शिक्षक संघाकडून सत्कार


गेली दोन ते अडीच वर्षापासून शिक्षण विभागाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने व विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने सतत प्रयत्नशील असणारे जिल्हा परिषद सांगलीचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी (भा.प्र.से.) यांचे कार्य शिक्षकांसाठी कौतुकास्पद व अभिमान वाटेल असे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी व्यक्त केले. १० जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांची ३०% रिक्त पदे पदोन्नतीने  तात्काळ भरणारी सांगली जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद असून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हाअंतर्गत बदल्यांपूर्वी पदोन्नतीचा तात्काळ लाभ दिल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे तसेच  प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

             सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मॉडेल स्कूलच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सुसज्ज इमारती ,दर्जेदार स्वच्छतागृहे, हॅन्ड वॉश स्टेशनसह शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उल्लेखनीय ग्रंथालय, उत्कृष्ट प्रयोगशाळा, आकर्षक व बोलक्या भिंती, विविध खेळांची क्रीडांगणे अशा अनेक भौतिक सुविधांयुक्त शाळा तयार करण्याचे यशस्वी कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या प्रेरणेने झाले असून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे विविध प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा,आनंददायी शिक्षणासाठी विविध उपक्रम, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचे कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून होत असून शिक्षक सुद्धा उत्साहाने काम करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट वाढण्यासही मदत होत असल्याचे मत अमोल माने यांनी व्यक्त केले.

            शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व संघटनांना एकत्रित बोलवून समस्या समजावून घेऊन तात्काळ प्रश्न सोडवण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत असून शिक्षण सेवक नियमितीकरण, पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात शाळा व तालुक्यांकडून माहिती घेऊन त्याची एकवट करून कोणतीही त्रुटी न ठेवता गेली दोन ते तीन महिन्यापासून या विषयावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी उत्कृष्ट काम केले असून २०१४ च्या अधिसूचनेनुसार राज्यात पहिल्यांदाच विस्ताराधिकारी वर्ग ३ श्रेणी २ ची पदे पदोन्नतीने  सांगली जिल्हा परिषदे कडून भरण्यात आली यासाठी  प्रभारी उपशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार चव्हाण ,अधीक्षक ज्योती पालकर , लिपिक प्रतीक्षा कोरे  यांच्यासह शिक्षण विभागातील स्टाफने  ज्यादा वेळ थांबून काम केले त्याबद्दल त्यांचेही  कौतुक करण्यात आले.

शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी २ ची १० पदे, शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी ३ ची १३ पदे , विज्ञान विषयाचे केंद्रप्रमुख १२ पदे व मुख्याध्यापक यांची  ५८ रिक्त पदे  तसेच कन्नड विभागाची काही पदे पदोन्नती देऊन तात्काळ भरण्यात आली त्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे व  प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा शिक्षक बँकेचे चेअरमन तथा शिक्षक संघ ( थोरात गटाचे ) जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक बँक संचालक तथा शिक्षक संघ  (शि.द.गटाचे) जिल्हाध्यक्ष अमोल माने, शिक्षक बँकेचे माजी संचालक तथा शिक्षक संघ ( थोरात गटाचे )  सरचिटणीस अविनाश  गुरव यांच्या हस्ते  शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

             शिक्षकांचे सर्वच  प्रलंबित प्रश्न  लवकरच सोडवले जाणार असून शैक्षणिक वर्षातील द्वितीय  सत्राच्या सुरुवातीस म्हणजे  ९ नोव्हेंबर २०२२ रोजी विद्यार्थी गुणवत्ता व विविध उपक्रम यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला जाणार असून सर्वच शिक्षकांनी  केंद्रस्तरावर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.  यावेळी अपग्रेड मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण ,नेते  संजय डोंगरे, अण्णासाहेब गायकवाड, शिक्षक बँक संचालक शामगोंडा पाटील, तानाजी थोरात, मनोहर होनमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________