KOLHAPUR : राजर्षी शाहूं महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज प्रमाणे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा विकास साधून त्यांना न्याय द्यावा. सादिकभाई शेख

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : राजर्षी शाहूं महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज प्रमाणे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा विकास साधून त्यांना न्याय द्यावा. सादिकभाई शेख
KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी

राजर्षी शाहूं महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज प्रमाणे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा विकास साधून त्यांना न्याय द्यावा.    सादिकभाई शेख.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती व सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले ते राज्य प्रत्येकाला आपलेसे वाटत होते व त्या राज्यासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी प्रत्येक धर्मातील जातीतील व्यक्ती हा आपल्या जीवाचे बलिदान देण्यासाठी तयार होता त्याच्याच आदर्श घेत राजर्षी शाहू महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना व अठरापगड जातीची लोकांना बरोबर घेऊन सुराज्य निर्माण केली व प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं कोल्हापूर मधील असणारी मुस्लिम बोर्डिंग व इतर धर्मियांची बोर्डिंग हे राजर्षी शाहू महाराजांच्या सर्व धर्माच्या विकासाच्या बाबतीत आणि उपेक्षितांच्या विकासाच्या बाबतीतील प्रचंड मोठे कार्याचे प्रतीक आहे आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या व सत्ता भोगणाऱ्यांना मात्र याचा विसर पडलेला आहे


 त्यामुळे अल्पसंख्यांक घटकापैकी मोठा घटक मुस्लिम समाज हा मागासलेल्यांच्या पेक्षा मागासलेला झालेला आहे सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या नावाने आपण राजकारण करत आहोत अशा महान विभूतींचा आदर्श घेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श घेत अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विकासामध्ये संधी उपलब्ध करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा त्याचबरोबर प्रशासनाने अल्पसंख्याक समाजासाठी व मुस्लिम समाजासाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून मुस्लिम समाजाचा विकास साधावा असा हल्ला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सादिकभाई शेख यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवसाच्या निमित्ताने दिलेल्या निवेदना नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. .


भारत देशातील अल्पसंख्यांक समाजापैकी मूलभूत घटक असणारा मुस्लिम समाज हा शासकीय योजनांच्या बाबतीत उपेक्षा टोचत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास तर सोडाच मुस्लिम समाज दारिद्र्याच्या खाईत लोटस चालला परमा पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी व अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने याची सुरुवात महाराष्ट्र सरकारने करावी अशा आशयाचे निवेदन घेत एम एम एन एफ चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जाकीर शिकलगार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा बनवून प्रशासनाला आदेश काढावेत अशी विनंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केलीएम एम एफ च्या या राज्यव्यापी आंदोलनामध्ये कोल्हापूर मधील मुस्लिम समाज सामील असून शासनाने एमए च्या विनंतीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी सूचना युसुफ शेख यांनी पत्रकारांच्या माध्यमातून केली
यावेळेस सामाजिक कार्यकर्ते रियाज बागवान नाशिक जमादार समीर दरवाज कर मौलाना पत्रकार समीर तांबोळी अजमुद्दिन भालदार व इतर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली 

_______________________________________________________

_______________________________________________________