SANGLI: रामानंदनगर येथे उद्योजकता मार्गदर्शन महामेळावा उत्साहात संपन्न...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: रामानंदनगर येथे उद्योजकता मार्गदर्शन महामेळावा उत्साहात संपन्न...SANGLI:
लोकसंदेश प्रतिनिधी

 रामानंदनगर येथे उद्योजकता मार्गदर्शन महामेळावा उत्साहात संपन्न...

   आज पलूस तालुक्यातील रामानंदनगर गावामध्ये व्यवसायिक व उद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन महामेळावा या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना,महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ मर्यादित.मुंबई,प्रधानमंत्री कल्याणकारी योजना यांच्या वतीने आयोजित केंद्र शासन व राज्य शासन यांच्या कडुन उद्योग करण्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य कसे मिळवावे? शासकीय योजना मिळवून नविन उद्योग कसा उभा करावा याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून तसेच आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनवू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या युवा वर्गाला व महिलांना सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला याची संकल्पना रामानंदनगर गावचे उपसरपंच मा.इम्रान पठाण यांची होती.


सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता मा.रवींद्र बुचडे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी (सेवानिवृत्त) व झाकीर मुल्ला पर्यवेक्षक,सांगली जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी यांनी सर्व योजनांची माहिती दिली 
त्याप्रसंगी रामानंदनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयश्री मदने,पलुस तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष मा.नारायण पाटील, संदीप राडे,योगेश वाईंगडे,मोहन शिंदे,पिंटु तुपे,ग्रामसेवक सतिश खाडे, ग्रामपंचायतीच्या क्लार्क सौ.सोरटे मॅडम,दैनिक पुढारीचे पत्रकार श्री तुकाराम धायगुडे,दै.सकाळचे पत्रकार किशोर आरबुने,दैनिक लोकमतचे पत्रकार राकेश तिरमारे,मा.संदीप नाझरे उपस्थित होते.मेळाव्याचे संयोजन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा.अमीर(भैय्या) पठाण यांनी केले होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD.

MUMBAI.


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन  सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

पत्ता : महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी,महाराष्ट्र स्क्रॅप,शंभर फुटी रोड ,नूरानी मशिदी जवळ,सांगली.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________