DELHI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
चित्रकार - शिल्पनिदेशक डॉ .विवेक चंदालिया यांना ' बाबासाहेब डॉ .बी.आर.आंबेडकर ' समाज रत्न राष्ट्रीय पुरस्कारा ने सन्मानित
मिरज येथे जन्मलेले चित्रकार व आयटीआय कोल्हापूर येथे पेन्टर जनरल शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत असणारे डॉ .विवेक चंदालीया मागिल अनेक वर्षापासून समाजात विविध क्षेत्रात शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनिय कार्य करत आहे . ते स्वःता चित्रकार असल्याने त्यांनी सोलापूरात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी असे ज्वलंत विषयांवर आय टी आय मधील प्रशिक्षणार्थीनीं सोबत रांगोळी व पोस्टरचे प्रदर्शने भरवून जनजागृती केली आहे. त्यांनी आय टी आय मधील पेंटर जनरल व्यवसाय अभ्यासक्रमावर आधारित मराठी व हिंदी भाषेत थेअरी पुस्तके लिहिली आहेत .सध्या ते भारत सरकारच्या निमि या संस्थेसोबत पेंन्ट ऍन्ड कोटींग सेक्टरमध्ये तज्ञ म्हणून कार्यरत आहेत .त्यांनी या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे अभ्यासक्रम देखिल तयार केलेले आहेत . सध्या ते आयटीआय कोल्हापूरची नोकरी सांभाळून बाल्मिकी या मागासवर्गीय समाजात शिक्षणाचा प्रचार - प्रसार करत आहेत .त्यांची या समाजासाठी 'झाडू छोडो कलम पकडो ' मोहिम देशभर चालू आहे. ते बाल्मिकी समाजातील मुलामुलींमधे व्यवसाय शिक्षणची जागृती देखिल करत आहे .
त्यांनी आयटीआय च्या माध्यमातून अनेक बेरोजगार मुला - मुलींना रोजगारश्रम प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे केले आहे . अशा शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनिय कार्यासाठी त्यांना विविध संस्थाकडून अनेक पुरस्कार प्राप्त आहे .त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखिल मिळालेला आहे .मागिल वर्षी त्यांना नेल्सन मंडेला नोबल पिस आवार्ड आणि मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. सध्या ते स्कॅवेंजर्सची सुरक्षा, त्यांचे पुनर्वसन व त्यांच्या पाल्याना शिक्षणात विशेष लाभाबद्दलची जनजागृती करत आहेत .बाल्मिकी समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करत असल्याने 5 S ( एस ) फौंडेशन या राष्ट्रीय सामाजिक संस्थे द्वारा डॉ .विवेक चंदालीया यांना रविवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे खासदार - मध्यप्रदेश राज्यसभा सदस्या श्रीमती सुमित्रा वाल्मीकी आणि माजी लोकसभा डेप्यूटी स्पीकर श्री.चरणजीत सिंग अटवाल ( पंजाब ) यांच्या शुभहस्ते ' बाबासाहेब डॉ .बी.आर.आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी भारतातील विविध राज्यतील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असलेल्या ३१ जनांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी लेखिका डॉ.राधा वाल्मीकी (झारखंड ), संजय घलोत- अध्यक्ष सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली, सुरेशभाई चौहान (कोलकता ) राजाभाई वाल्मिकी (मुंबई ), हरिष रेवाडीकर ( गोवा ), श्री बेदी पुर्व कॅबिनेट मंत्री (हरियाना ), काशीराम चौहान (कर्नाटक) , गुरमुखसिंग कोशला (पंजाब ), मयंक हंसराज ( उ प्र) डॉ .विजय रामबाबू श्रवण ( मध्य प्रदेश) मिल्कीत सिंग कल्यान ( चंदीगड ) लेखराज, प्रिती डोगरा,शक्ती चौहान , संजय कल्याने,
टूकीराम वैद्य, नरेश चौधरी इत्यादी मान्यवर हजर होते . या कलावंताला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कला व शिक्षण क्षेत्रात मान्यवरांचे करून विशेष कौतुक होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________