जिल्हा सांगली : तालुका तासगांव येथील तालुका पत्रकार संघाच्या धरणे आंदोलनाला मोठे यश !

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जिल्हा सांगली : तालुका तासगांव येथील तालुका पत्रकार संघाच्या धरणे आंदोलनाला मोठे यश !

लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी :  अभिजित शिंदे.
सांगली.


जिल्हा सांगली : तालुका तासगांव येथील तालुका पत्रकार संघाच्या धरणे आंदोलनाला मोठे यश !

तालुक्यात होणारे गौण खनिज उत्खननाची ' ईटीएस मोजणी सुरू ; तर या मोजणी प्रक्रियेत पत्रकारांचा समावेश करण्याची प्रांताधिकाऱ्यांची संमती .


पत्रकार दिलीप जाधव यांचेवर दाखल झालेल्या NCR मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसात निर्णय ...पत्रकारांचे आंदोलन मंगळवारपर्यत स्थगित आज दिवसभर तालुक्यासह जिल्हयातील सर्व पत्रकार व सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा.


 तासगाव येथे पत्रकार दिलीप जाधव यांच्यावर गौण खनिज उत्खननात झालेल्या गडबडीची सप्रमाण बातमी प्रसिद्ध केली म्हणून तासगाव पोलिसांनी जो गौण खनिज ठेकेदारांची बदनामी केली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल केला त्याविरूद्ध आंदोलन करुन एकतेची ताकद दाखवून दिली.मिरज प्रांतांनी तासगाव तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन स्थळी येऊन सोमवारपर्यंत चौकशी करुन गौण खनिज चोरीची चौकशी करण्याचे आणि पत्रकारांच्या उपस्थितीतच जानेवारीत होणाऱ्या वार्षिक गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करण्याचे आश्वासन दिले. हा आपला विजय आहे. तुमच्या प्रत्यक्ष आणि एसएमएस द्वारे व्यक्त केलेल्या संतापामुळे हे घडले. 

    पण आता आश्वासनावर मानायचं नाही !!

 गौण चोरीचा माग घेऊच, पण तासगाव पोलीस ठाण्याच्या ज्या प्रभारी अधिकाऱ्याने शहानिशा न करता पत्रकारावर गौण खनिज चोरांचे ऐकून गुन्हा नोंदवला गेला त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे असे या बैठकीत एकमताने सविस्तर चर्चा झाली. 

सदरील प्रकरणाचे गांभीर्य ओळखता सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेट घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार यांच्यावर कोणतीही शहानिशा न करता जो गुन्हा दाखल केला आहे त्या अधिकाराची तत्काळ चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन लवकरच देणार .


        पत्रकारांवर दबाव आणून त्याला कर्तव्यापासून रोखण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपण त्यासाठी झटणारच. याच निर्धाराने पुढे जाऊया असे धरणे आंदोलनावेळी सर्व पत्रकारांचे एकमत झाले.


यावेळी प्रांत समीर शिंगटे यांनी एन सी आर मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसात निर्णय घेत महसूल बुडावणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने पत्रकारांचे आंदोलन मंगळवारपर्यत स्थगित करण्यात आले.


तासगांव तालुका पत्रकार संघाच्या धरणे आंदोलनाला मोठे यश!

तालुक्यात होणारे गौण खनिज उत्खननाची' ईटीएस मोजणी सुरू; तर या मोजणी प्रक्रियेत पत्रकारांचा समावेश करण्याची प्रांताधिकाऱ्यांची संमती व ग्वाही दिली

यावेळी स्वागत प्रास्ताविक पत्रकार संजय माळी यांनी केले, आभार विष्णु जमदाडे, बाबुराव जाधव, गजानन खुजट, ताजउद्दीन तांबोळी, विश्वास पाटील, तानाजी जाधव, ज्योतीराम जाधव, भाऊसाहेब मोहिते, यशवंत कदम, तुकाराम धायगुडे, विलास साळुंखे, पांडुरंग जाधव, शिवराज काटकर, कुलदीप देवकुळे, प्रविण शिंदे, लोकसंदेशचे सलीम नदाफ,चंद्रकांत क्षीरसागर, मिलिंद पोळ, विक्रांत पाटील, चंद्रकांत गायकवाड, विठ्ठल चव्हाण, रवींद्र माने, विनायक विभुते, संजय बनसोडे, गोरख चव्हाण, प्रदीप पोतदार, संग्राम कदम यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून 150 पत्रकारांनी उपस्तिथी लावली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.