सीमा प्रश्नावर आपण सारे झिंगु :--- निवडणुका आल्यावर आणि दरवर्षी नोव्हेंबर मध्ये " सीमा प्रश्न" नामक काहीतरी अदृश्य जुनाट मढं काही ठराविक लोक उकरून काढतात. उगाळतात. पोळ्या भाजून घेतात. निवडून येतात..... सुधीर मुतालीक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सीमा प्रश्नावर आपण सारे झिंगु :--- निवडणुका आल्यावर आणि दरवर्षी नोव्हेंबर मध्ये " सीमा प्रश्न" नामक काहीतरी अदृश्य जुनाट मढं काही ठराविक लोक उकरून काढतात. उगाळतात. पोळ्या भाजून घेतात. निवडून येतात..... सुधीर मुतालीक
*📦 सीमा प्रश्नावर आपण सारे झिंगु :*

सुधीर मुतालीक

मी निपाणीचा. माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. पुढे पुण्यात शिक्षण आणि आता बंगळुरूमध्ये स्थायिक. https://bit.ly/3MulwsO घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते. त्या हद्दीलगत अर्जुनी नावाचे छोटे गांव आहे. अगदी छोटं. अर्जुनीची लोकसंख्या आहे १७६०. गावात एकूण घरं ३५४. मी सातवी पर्यंत कर्नाटकात शिकलो आणि आठवी ते बारावी अर्जुनीमधल्या शाळेत. पुढे इंजीयरिंग महाराष्ट्रात. आता मी नाशकात स्थाईक. मला बरं कानडी समजतं आणि येतं. घरातले सगळे माझ्या पेक्षा उत्तम कानडी बोलतात, लिहितात वगैरे. वडील निपाणीतल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होते.आज ही माझे गांवी निपाणीला नियमित जाणे होते. घर आहे. मोप मित्र आहेत. 'बसलो' की कानडी आणि मराठी मधून गप्पा विनोद होतात. काका मावशी बेळगांव मध्ये आज ही आहेत. त्यामुळे बालपण बरंच निपाणी, संकेश्वर,बेळगांव, अश्या ठिकाणी गेलं. या सगळ्या वाटचालीत तो कन्नडीगान्चा अन्याय त्यांचे अत्याचार किंवा जबरदस्ती, दादागिरी वगैरे वगैरे काही मला तरी आजवर दिसले नाही. मला नाही. माझ्या कुटुंबियांना नाही. मित्रांना नाही. शेजाऱ्यांना नाही. सगळे सुखात आहेत.निवडणुका आल्यावर आणि दरवर्षी नोव्हेंबर मध्ये " सीमा प्रश्न" नामक काहीतरी अदृश्य जुनाट मढं काही ठराविक लोक उकरून काढतात. उगाळतात. पोळ्या भाजून घेतात. निवडून येतात. आणि थोडे दिवस शांत होतात. एक नोव्हेंबरला काळा दिवस म्हणतात. हरताळ पाळतात. लहानपणीपासुन दरवेळी हे बघितलंय. अनुभवलंय.या दिवसात मुंबई पुण्यातले मोठे लोक येतात. राजकारणी येतात. नेहरू चौकातल्या नळावर सभा भरते. तुमच्यावर अन्याय होतो असे आक्रोश करून सांगतात. मजबूत पेटवतात. निघून जातात.

काहीजण मग पेटतात. अन्याय होतोय म्हणतात. १ नोव्हेंबरला काळी फीत बांधून फिरतात. वर्षानुवर्षे हे चालू आहे. आम जनतेला यातल्या " कडकडीत हरताळ, दंगा, कर्फ्यू, गोळीबार इतकाच त्रास होतो. या व्यतिरिक्त जनता सुखात आहे.


आमच्या शाळा कर्नाटकातल्या असल्या तरी माध्यम मराठी होते. निपाणी, बेळगांव वगैरे परिसरातल्या कितीतरी शाळा मराठी माध्यमांच्या आहेत. बोर्ड बंगळूरुचे. आम्ही मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकलो. मी सुमारे सहाव्या यत्ते मध्ये शिकत असताना कन्नड विषय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली. कन्नड शिकणे सक्तीचे असले तरी त्या विषयात पास होण्याची अट नव्हती. त्यामुळे धमाल असायची. मित्र धमाल करायचे. मजा यायची. आम्ही गमजा करायचो आणि बाहेर पेपरात मात्र "कन्नडीगांचा आणखी एक अत्याचार" वगैरे मथळ्याच्या बातम्या यायच्या. नळावर उपोषण वगैरे झाले. एखादा दिवस हरताळ पाळला. आम्हाला वट्ट घेणंदेणं नव्हतं.

शाळेत त्यानिमित्ताने नवीन गुरुजी आले. कोरे गुरुजी. कानडीचे शिक्षक. निपाणीच्या शेजारी असणा-या पट्टणकुडीचे. पहिल्या दिवशी वर्गात आले आणि डायरेक्ट कानडीतूनच बोलायला लागले. त्यांचा वर्गावर पहिला दिवस होता त्यामुळे आम्ही प्रथे प्रमाणे गोष्ट सांगायची गळ घालायला लागलो. खूप हट्ट केला. मध्येच गुरुजी मराठीत काहीतरी बोलायचे आणि आम्हाला धो धो हसू यायचे. कारण त्याना मराठी जाम बोलायला यायचे नाही. त्यामुळे त्यांचे मराठी उच्चार भीषण विनोदी असायचे. पण गुरुजींनी आमची विनंती मान्य केली. त्यांनी गोष्ट सुरु केली आणि ती सुमारे महिना भर चालली. आज ही मला त्यांच्या कथनाची आठवण झाली की शहारायला होतं. त्या गोष्टी मध्ये आम्ही सगळे मित्र इतके बुडून गेलो होतो की कोरे गुरुजींचा तास झालेल्या दिवशी आमच्या मित्रांपैकी बहुतेकजण न केकाटता न बोंबलता घरी जायचो. कोरे सरांच्या आम्ही तासाची प्रचंड वाट बघायचो. गोष्ट होती - "तीन मुले". साने गुरुजींचे हे पुस्तक शामची आई इतके प्रसिद्ध नसावे कदाचित. पण मराठीतच उपलब्ध असणारे हे पुस्तक आमच्या कानडी गुरुजींनी कोळून प्यायलं होतं. त्यांना जे कथन करायचे होते ते त्यांनी केलं, आम्हाला व्यवस्थित समजलं. आणि आजही आमच्या हृदयात ती कथा आम्ही लालबुंद मलमली कपड्यात बांधून, अगदी जपून ठेवली आहे.

आम्ही कानडी लोकांच्या सहवासात ज्यास्त वावरलेलो आणि बंगळूरू बोर्डांच्या शाळांमध्ये शिकलेलो आणि माझा जन्म दाखला अस्सल कानडीतून लिहिलेला. जनतेचा "अन्याय" या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ??? निपाणी बेळगांव कारवार कर्नाटक राज्यामध्ये असणे हा अन्याय असेल तर काश्मीरच्या घाटीमधून घरदार उद्योग शाळा सोडून एका रात्रीतून हुसकावून लावलेल्यांवर झालेल्या दादागिरीला काय म्हणायचं ??? किंवा अशा अनेक घटना.

आपला समाज मला बऱ्याचदा अट्टल दारूखस वाटतो. पोळी भाजून घेणाऱ्यांना हे चांगलं माहिती झालयं की, हा समाज दारूखस आहे आणि येडा ही आहे. पोळी भाजून घेणारे हे हुशार लोक, एखादा अत्यंत पोकळ 'सीमा प्रश्ना' सारखा महाप्रचंड निरर्थक मुद्दा बेमालूमपणे शोधून काढतात. पार तो किसून आणि गाळून त्याची दारू बनवितात. ती दारू पाजून समाजाला वर्षानुवर्षे झिंगत ठेवतात. झिंगणाऱ्या येड्या जनतेला खरे काय आणि खोटे काय किंवा खरंच काय हवंय आणि काय नको हे ही समजतच नाही. निपाणी सारख्या भागात औद्योगिक विकास शून्य आहे. नोकरी धंद्यासाठी युवकांना निपाणी बाहेर पडावे लागते. गावांत नोकऱ्या नाहीत. असे अनेक ठिकाणी. भाकरी, पाणी, सुरक्षित शांत झोप, आरोग्य या आणि अशा अन्य काही जगण्याच्या किमान गरजांची अनेक ठिकाणी भ्रांत आहे. पण अजुनी कर्नाटकातच आम्हाला ठेवलंय आणि हा आमच्या वर अन्याय आहे म्हणुन गळा काढून रडणाऱ्या जनतेची शुद्ध हरपली आहे असे नाही वाटत ? ते तिकडे सीमा भागात झिंगत राहतात आणि त्यांची झिंग कायम राहावी म्हणुन आजूबाजूचे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर कविता करतात, लेख लिहितात, चर्चा घडवून आणतात. पिढ्यान पिढ्या हेच चाललंय !
©️सुधीर मुतालीक


लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________

संपादकीय....

महाराष्ट्र कर्नाटक आणि भारत पाकिस्तान हे विषय आता लोकांना उल्लू बनवण्यासाठी कसे हाताळायचे हे राजकारण्यांना चांगल माहिती आहे..

निवडणुका जवळ आल्या की ,महाराष्ट्रात महाराष्ट्र कर्नाटक व केंद्रात भारत पाकिस्तान हे विषय फार मोठ्या चवीने चगळले जातात ...

सीमा वासियाना त्याच्याशी काही देणे घेणे नाही... आम्ही पण सांगलीत राहणारे कर्नाटकात आमच्या जमिनी परंतु आम्हाला असं कधी वाटलं नाही की, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि कर्नाटक वाल्यांच्याकडून अत्याचार वगैरे होतो किंवा कर्नाटक वाल्यांना कधी वाटलं नाही की आम्ही कर्नाटक मध्ये राहतो आणि महाराष्ट्राकडून अत्याचार होतोय, हा  विषय म्हंजे फक्त "बोलाचा भात आणि बोलाचि कढी'.. ही कढी निवडणुकीच्या वेळेस  फार मोठ्याने उफाळून येते
या कढीस फोडनी देण्याचे काम दोन्ही बाजूने होते..

 आमच्या (आईचे वडील म्हणजे) आजोबा अथणीचे आणि (वडिलांचे वडील) मनेराजुरीचे त्यावेळी हा भारत पाकिस्तान आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न नव्हता नाहीतर आम्ही या जगातच आलो नसतो...

जनतेला उल्लू बनवण्यासाठी सीमा वादाचे प्रश्न कसे हाताळले जातात हे आपण आता 40 /50 वर्षात पाहिलेल आहे

 जसे WHO संघटनेने आम्ही जगाला किती मूर्ख बनवू शकतो या माध्यमातून संपूर्ण जगात "सर्दी पडशाला" कोरोनाचे नाव देऊन सर्व जगण्यास लुटले आणि आपल्या संबंधिताना त्याचा फायदा करून दीला. . तशाच प्रकारचा हा एक विषय आहे....

राजकारण्यांच्या म्हणण्यानुसारच कोरोना येतो, का तर कोरोना त्यांचा आजोबा आहे आणि तेच डिक्लेअर करतात आता मी येणार आहे, तो त्यांच्या कानात सांगतो की ,आता मी येणार आहे आणि तुम्ही तोंडाला मास्क वगैरे लावून फिरा...  इतकं उल्लू बनवण्याचे कार्य हे संघटनेने बनवले त्याला सगळे बळी पडले तशाच प्रकारचा एक हा विषय महाराष्ट्र कर्नाटक सीमित सिमेचा आहे

आमचा खानदानी धंदा म्हणजे ट्रक व्यवसाय,ट्रान्सपोर्ट  व्यवसायामध्ये आमची जिंदगी गेली, पन्नास वर्षे झाली आमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे  परंतु सीमा प्रश्नावरून ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना कधी कर्नाटकातल्या जनतेने वाद केलेला नाही किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने कर्नाटकांतून येणाऱ्या  गाड्यांची आडवणुक केली नाही...

 परंतु  केंद्र सरकारने पद्धतशीरपणे अडकवून ठेवलेले आहे .. महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा मध्ये गोवा, कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, व गुजरात ही सर्व राज्ये आहेत . मात्र आमच्या गाड्या जाताना प्रत्येक सीमेवर त्याचा टॅक्स वेगळा भरावा लागतो.... आम्ही  केंद्रीय मंत्री गडकरींना एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही आम ची वाहन घेऊन काय  पाकिस्तान, बांगलादेश ,मलेशिया, नेपाळ,मध्ये जात नाही आणि या सीमा म्हणजे राज्याच्या सीमा आहेत देशाच्या नाहीत याचा गांभीर्याने विचार करून या सीमावर बसणारे टॅक्सेस किमान वाहतूकदारांना तरी कमी करावेत व बिन बोभाट कुठलेही परमिट न लागता सर्व गाड्या संपूर्ण भारतात फिराव्यात म्हणजेच देशाची प्रगती होईल अन्यथा... 100 पैकी वीस गाड्यांचे परमिट लगतच्या राज्यांचा असतं त्यामुळे 80 टक्के गाड्या त्या राज्यात जाऊ शकत नाहीत आणि एक प्रकारची केंद्र सरकारकडून ची अडवणूक आहे असं मला वाटतं

आता सीमा प्रश्नाच्या बातम्या आपण चगळ्त बसायचं.  आहे.... पत्रकार रवीश कुमार म्हणतात तसं ...टी व्ही बघण्याचे सोडून दिले तर... आपली प्रगती होईल नाहीतर अलीकडच्या काळात तुम्हाला विकास ,प्रगती, शिक्षण, याच्यापासून वंचित ठेवण्यासाठी बरीच माध्यमे पद्धतशीरपणे सरकारने  तुमच्या हातात दिलेली आहेत .

 पहिलं माध्यम आहे "मोबाईल "त्याच्यात तुम्ही गुर्फ्टून जावं म्हंजे सरकार बद्दल प्रश्न करायचे नाहीत, त्यानंतर माध्यम आहे "चलो खाना हुआ अभी थोडा रमी खेलेंगे"
त्याबद्दल आपल्यावर जुगार लादला गेला आहे... एका सिस्टमने व्यवस्थित आपल्या डोक्यावर आणि आपल्या तरुणांच्या वर, आपल्या भारतीयांच्यावर ही मारलेली सिस्टम आहे, ज्या राज्यात दारूबंदी आहे तिथे देखील दारूंचा महापूर आहे, म्हणजे तुम्ही विकास ,सरकार, यांच्या विरोधात काहीही बोलायचं नाही, आता तुम्ही गुलाम झालेले आहात आणि या गुलामगिरी मध्ये तुम्ही जगायचं आहे आणि झिंगत राहायचं आहे... तुमचं जगणं म्हणजेच तुमचा विकास आहे ...इथपर्यंत सरकारने तुम्हाला आणून ठेवलेले आहे... याचा विचार करायला कोणी तयार नाही... त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक हा प्रश्न " सुधीर मुथालिक" म्हणतात तसं झिंगत ठेवण्यासाठीच आहे याच्यातून निष्पन्न काही होणे नाही असो ....

आपला: सलीम नदाफ 
 संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली.
8830247886