Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून हे भाऊ बहिण पक्ष बळकटीसाठी अहो रात्र कष्ट घेत आहेत त्यांच्या कष्टाचे चीज कधी होईल माहीत नाही.... मात्र चांगला प्रयत्न करत आहेत ..लोकशाहीत विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे व तो टिकला तरच सत्ताधारी व्यवस्थित कारभार करतील ..सतीश साखळकरSANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून हे भाऊ बहिण पक्ष बळकटीसाठी अहो रात्र कष्ट घेत आहेत त्यांच्या कष्टाचे चीज कधी होईल माहीत नाही.... मात्र चांगला प्रयत्न करत आहेत ..लोकशाहीत विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे व तो टिकला तरच सत्ताधारी व्यवस्थित कारभार करतील ..... सतीश साखळकरराहुल गांधी ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या पद्धतीने पक्षातील प्रस्थापित नेते स्थानिक लेवलला काम करणार का ...?


स्थानिक लेवलला गटबाजी नवीन नाही .... मात्र पक्षातील विरोधकांना संपवण्यासाठी विरोधी (भाजपा सारख्या पक्षातील उमेदवारांना मदत करणे) अंतर्गत साटे लोटे ज्या पद्धतीने आहे .. त्याचा या पक्ष्याला तोटा होत आहे हे सांगायला कोण्या जोतीष्याची गरज नाही..


भारतीय जनता पक्षात सुध्दा गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे मात्र तेथे वरिष्ठ नेत्यांचा धाक म्हणा किंवा आदेश पळताना दिसते ...ते काँगेस मध्ये दिसत नाही
भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेत यायचा असेल तर अंतर्गत साठे लोठे थांबले पाहिजेत असो.   हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत भाग आहे मात्र राहुल गांधी यांचे कष्ट पाहता लिहावे वाठले


सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली 
_________________________________________________

संपादकीय,
आम्हास असे वाटते की ,या वीस वर्षात सांगली काँग्रेसमध्ये जी दैना झालेली आहे ...त्याच्यासाठी फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेच जबाबदार आहेत... याचं कारण असं आहे की,वसंतदादांच्या काळात किंवा मदन पाटलांच्या काळात एक धाक होता .. पण मदन पाटलांना सुद्धा अंतर्गत विरोध झाला... मात्र त्यांनी त्यावेळेला तो विरोध आपल्या ताकतीवर झुगारून टाकला.. तसाच विरोध आत्ता देखील अंतर्गत माध्यमातून होत असतो... मग ते विशाल पाटील असतील, प्रतीक पाटील असतील पृथ्वीराज बाबा असतील, ....किंवा सहयोगी पक्ष असो, सहयोगी पक्षांना येथे काँग्रेस रूजावी असं वाटत नाही... सांगलीची दैना कशी होईल याबाबतीतच सहयोग पक्ष आघाडीवर असतो .. आणि आपण पाहिलेल आहे... परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतीत जाण होत नाही...
 आपल्यात माणसाचे पाय कसे ओढावेत याबाबतीतच काँग्रेसमध्ये रस्सीखेच चालू आहे  ...(तसं पाहायला गेलं तर आजच्या राजकीय वातावरणात काँग्रेसला अच्छे दिन येणार आहेत परंतु.).

जो पर्यंत काँग्रेसची नेतेमंडळी एक पाऊल मागे घेत ...एकदिलाने एकत्रित येत नाहीत तोपर्यंत सांगलीमध्ये काँग्रेसचे काय खरं नाही.... गटातटाच्या राजकारणातून काँग्रेसला संपवण्याचा विडा बाहेरील सहयोगी गटांनी घेतलेलाच आहे . आणि तो स्पष्ट दिसत आहे... मात्र आता या नेत्यांना कसं कळणार.   आणि यांच्या गटा त टा च्या राजकारणामध्ये काँग्रेसला लयास गेलेली आहे ..साध्या  महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उमेदवार देताना गट पहिला जातो... माझ्या उमेदवारास तिकीट मिळाल पाहिजे आणि नाही मिळाल तर दुसरा गट त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करतो.. हे आम्ही पाहिलेल आहे ...असं होत असेल तर मला राज्याचं नेतृत्व केलेल्या सांगलीच कसं होणार...  सहयोगी म्हणणारे पक्ष ज्यांना सांगलीची जरा देखील अस्था नाही असे सांगलीची दैना केल्यानंतर परत "झोला उठा के हमारे हमारे गाव जायेंगे"" आम्ही आमच्या गावी जाऊ...  असं ब्रीद असलेल्यांच्या बरोबर सहयोग करणे कितपत योग्य आहे.....

सलीम नदाफ
 संपादक ::लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,  सांगली
_________________________________________________