पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यादेवी चौक ते सुंदर पार्क रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण सुरू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यादेवी चौक ते सुंदर पार्क रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण सुरू




लोकसंदेश न्यूज नेटवर्क सांगली

पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यादेवी चौक ते सुंदर पार्क रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण सुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते सुंदर पार्क सांगली या ४५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे डांबरीकरणाचा शुभारंभ सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, यांच्या हस्ते महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समारंभपूर्वक झाला.



नगरविकास विभाग यांच्याकडे पृथ्वीराज पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झालेल्या १० कोटी रकमेतील अंदाजे ४५ लाख रुपये रक्कमेचे हे काम आहे. 


यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, उपनगरातील रस्ते चांगले व दर्जेदार व्हावेत, यासाठी नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. वाढत्या शहरीकरणामध्ये चांगले रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. यापुढेही रस्ते विकासाबरोबरच शहर विकासाच्या इतर बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष देऊ.
 
 नगरसेवक संतोष पाटील,  अल्ताफ पेंढारी, यांनी या कामाकरीता पाठपुरावा केला. या वेळी नगरसेवक मनगु सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, मदीना बारूदवाले, इलही बारुद वाले, बी एस पाटील, प्रताप चव्हाण, आशीष चौधरी, राजू कलाल, पैगंबर शेख, मौला वंटमुरे तसेच परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

        कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT. LTD.

MUMBAI.




संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.

कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________