पवित्र हज यात्रा 2023 साठी यात्रेस इच्छुक असणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची बातमी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पवित्र हज यात्रा 2023 साठी यात्रेस इच्छुक असणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची बातमी




लोकसंदेश न्यूज नेटवर्क
MUMBAI 

पवित्र हज यात्रा 2023 साठी हाज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हाज यात्रेस इच्छुक असणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची बातमी , 

चालू हाज 2023 साठी हाज फॉर्म भरण्यासाठी दिनांक 10/0 2/2023 पासून दिनांक 10/03/ 2023 पर्यंतची मुदत हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मो.याकूब शेख साहेबांचे सहीचे सर्क्युलर जाहीर करण्यात आले आहे.


दरवर्षाप्रमाणे
" खिदमत हुज्जाज कमिटी" एसटी स्टँडच्या मागे ,शंभर फुटी रोड, हॉटेल शिवप्रसाद जवळ सांगली, येथे इच्छुक हाज यात्रेकरूंच्या सोय व सवलतीसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध केले असून सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा व आम्हास आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे अहवान हाजी मुनीरभाई आत्तार, अध्यक्ष खिदमत हुज्जाज कमिटी सांगली यांनी केले आहे.


ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) इंटरनॅशनल मशीन रेडियबल पासपोर्ट ज्याची अखेरची मुदत 3 फेब्रुवारी 2024 ,
2)प्रत्येक अर्जदाराचा रक्तगट माहिती असणे आवश्यक
3)कोरा रद्द केलेला बँकेच्या खात्याचा चेक किंवा बँक पासबुकचे पहिल्या पानावर आपले नाव फोटो खाते नंबर आयएफएस कोड स्पष्ट असल्याचे पासबुक
4) व्हाईट बॅकग्राऊंड फ्रंट पोजचा कलर फोटो
5) covid-19 प्रतिबंधक लसीकरणाचा दाखला
6) आधार कार्ड पॅन कार्ड
वरील प्रमाणे कागदपत्राची आवश्यकता आहे

हाज 2023 च्या हाज यात्रेसाठी 70+ वयाचे तीर्थयात्रे करूना सर्वोच्च प्राथमिकता दिली असून 70+ वयाचे तीर्थयात्रे करून सोबत त्यांच्या परिवार किंवा जवळच्या व्यक्तीस एका नातेवाईकास मान्यता देण्यात आली आहे हाज कमिटी मार्फत "जीवनात फक्त एक वेळा हाज यात्रा" हे धोरण जाहीर करण्यात आले आहे. एक कव्हर ग्रुप मध्ये जास्तीत जास्त एका कुटुंबाचे किंवा जवळचे नातलग 4 लोकांना व 2 शिशु (मुलांना)अर्ज करता येईल,यापेक्षा जास्त कुटुंबातील व नातेवाईकांची संख्या असेल त्यांनी वेगळ्या कव्हर ग्रुप करून अर्ज दाखल करण्याचा आहे. हाज फॉर्म भरताना नॉमिनीच्या कॉलम मध्ये आपल्या जवळच्या जबाबदार नातेवाईकाचे नाव मोबाईल नंबर पत्ता पूर्णपणे व्यवस्थित नोंद करण्याची आहे.


आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत अधिक माहितीसाठी आमचे शंभर फुटी रोड येथील कार्यालयात संपर्क साधावा व आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती हाजी मुनीरभाई अत्तार यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.