सांगलीतील मुस्लिम व ख्रिस्ती समाज दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -- पृथ्वीराज बाबा पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीतील मुस्लिम व ख्रिस्ती समाज दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न -- पृथ्वीराज बाबा पाटील
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगलीतील मुस्लिम व ख्रिस्ती समाज दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न --
पृथ्वीराज बाबा पाटील


सांगली शहरातील शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमी प्रश्नांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

शामरावनगर येथील मुस्लिम आणि ख्रिस्ती दफनभूमी प्रश्न मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्यावतीने पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुस्लिम व ख्रिश्चन समाज दफनभूमी जागा हस्तांतरणाबाबत प्रशासकीय यंत्रणा तात्काळ राबवून मुस्लिम तसेच ख्रिस्ती समाजाच्या दफन भूमीबाबत जागा मोजमाप करून दोन्ही समाजाचे फलक लावून लोकार्पण करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रश्नामध्ये आपण प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी स्तरावर पाठपुरावा करून दोन्ही समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास  श्री. पाटील यांनी यावेळी दिला. याबद्दल मुस्लिम समाजाच्यावतीने श्री. पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन सिकंदर जमादार, असिफ बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, इरफान शिकलगार, सलीम पन्हाळकर, ताजुद्दीन शेख, हाजी मुनीर अत्तार, अल्ताफ पेंढारी, युसुफ जमादार, याकूब मनेर, हाजी महमद अली मुल्ला, सरफराज शेख, राजू महात, असलम जमादार, समीर मालगावे, शफिक शेख, नईम शेख, टिपू इनामदार व मुस्लिम समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली