जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेज महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेज महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
जयसिंगपूर दि. 12/02/2023

जयसिंगपूर
येथील डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेज महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्नयेथील डॉ. जे जे मगदुम फार्मसी कॉलेज महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेज महाविद्यालय आणि डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेज अलुमणी असोसिएशन, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

गेल्या 28 वर्षापासून फार्मसी शिक्षण क्षेत्रात ठसा उमठावणान्य डॉ. जे जे मगदुम फार्मसी कॉलेजचे 1993 पासून आज पर्यंतचे माजी विद्यार्थी या प्रसंगी एकत्र आले होते. फार्मसी निगडीत विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात राज्यातून या मेळाव्यात सहभाग नोंदवला.


विद्यार्थी- विद्यार्थिनी २८ वर्षांनंतर एकमेकांना भेटले, या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत
रममान होताना डोळ्यातून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही, एकमेकाशी हितगुज करताना
महाविद्यालयीन जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली,


तसतसे भूतकाळात
शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वानाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि
माजी विद्याथ्र्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.

सुरुवातीस स्व. डॉ. जे जे मगदुम स्व. डॉ प्रभाताई मगदुम व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व. बी. के. कोथळी सर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपला परिचय करून दिला. याप्रसंगी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या स्नेहमेळाव्यासाठी 200 पेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी आपला सहभाग नोंदवला. कॉलेजच्या वर्तमान आणि

भविष्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत आणि मार्गदर्शन देण्याचे आश्वासन याप्रसंगी
माजी विद्यार्थ्यांनी दिले

कॉलेजचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. आनंद कुलकर्णी यांनी सर्वाना 'सुखी जीवन' या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमासाठी डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेज अलुमणी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरणकुमार डिग्रजे, उपाध्यक्ष श्री. अभिजीत पाटील आणि सचिव श्री. महेंद्र मगदुम यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल साळोखे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे काम महाविद्यालयाच्या डिप्लोमा विभाग प्रमुख सौ. एस. वी. मगदुम यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. जे जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदुम आणि वाइस चेअरपर्सन अडो. डॉ. सोनाली मगदुम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक प्रा. सौरभ समडोळे यांनी मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...


त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           

             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________