लोकसंदेश न्यूज इफेक्ट..... विस्तारित भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावणार आमदार सुधीर गाडगीळ ; आमदार निधीमधून प्रभाग १८ मध्ये रस्ते कामास सुरवात....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसंदेश न्यूज इफेक्ट..... विस्तारित भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावणार आमदार सुधीर गाडगीळ ; आमदार निधीमधून प्रभाग १८ मध्ये रस्ते कामास सुरवात....
                     लोकसंदेश न्यूज इफेक्ट...
लोकसंदेश न्यूजने शामराव नगर भागातील समस्यांचा पाढा वारंवार या दहा वर्षात मांडलेला आहे  ..त्याचाच परिणाम म्हणून ...आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी या भागाचा कायापालट करणार असल्याचे सांगत आता यासाठी मंत्री स्तरावर चर्चा करून... लगेचच कामास सुरुवात केलेली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले आहेत.

                 लोकसंदेश न्यूज सांगलीविस्तारित भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावणार
आमदार सुधीर गाडगीळ ; आमदार निधीमधून प्रभाग १८ मध्ये रस्ते कामास सुरवात....
                  लोकसंदेश न्यूज इफेक्ट

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीमधून शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील दोन रस्त्यांच्या कामांसाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खिलारे मंगल कार्यलय मुख्य रस्ता ते प्रथमेश कांबळे यांचे घर व आकाशवाणी पाठीमागील मुख्य रस्ता ते


नारायण यनकलेव यांचे घर या दोन रस्त्यांच्या यामध्ये समावेश आहे. आमदार गाडगीळ यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान शामरावनगरसह विस्तारित भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिली. ते म्हणाले,


राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विकास कामामध्ये गतिमान आहे. विकासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे.


काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीग्रस्त व महापुरग्रस्त भागातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी होकार देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे...


यावेळी शहाजी भोसले, शैलेश पवार, रोहीत जगदाळे, रोहीत बाबर, उमेश नरगूंदे, अमर पडळकर, प्रशांत पाटील सर, रविंद्र करंजे, दिनेश डबडे ,सचिन गवळी, सचिन दौडमणी, शोयब नदाफ, बापू कांबळे, अनिल जाधव, ओंकार जाधव, संजय जाधव, ज्ञानेश्वर डबडे, गजनान कांबळे, अभिजीत खांडेकर, गणपती साळुंखे, ठेकेदार डी एम पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुण पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_________________________________________________________________

 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
       
   

             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________