अजून किती लुटाल? शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाल्याचा केंद्रीय कृषिमंत्री दावा करतात. परंतु शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अजून किती लुटाल? शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाल्याचा केंद्रीय कृषिमंत्री दावा करतात. परंतु शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

अजून किती लुटाल?

शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाल्याचा केंद्रीय कृषिमंत्री दावा करतात. परंतु शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे हे खालील एका गव्हाचे उदाहरण देऊन सिद्ध करीत आहे. *हे इतर सर्व पिकांनाही लागू आहे.*


1. सन 2022- 23 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राला शिफारस केलेली गव्हाची किंमत 3755 रुपये प्रति क्विंटल होती. पण केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत (MSP) 2015 रु. प्रति क्विंटल जाहीर केली. *म्हणजे 46.3% कमी.*
स्वामीनाथन शिफारसी प्रमाणे 50% नफा वाढवायचे तर दूरच राहिले. 

2. सन 2023 - 24 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेला गव्हाचा हमीभाव आहे 2125 रु. प्रति क्विंटल. *म्हणजे इतर शेतीच्या निविष्ठाचे दर, उत्पादन खर्च व महागाई भरमसाठ वाढत असताना फक्त 1.10 रू. प्रति किलो वाढ केली.* 

3. युक्रेन -रशिया युद्ध, रुपयाचे अवमूल्यन व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गव्हाचे भाव चांगलेच वाढले असताना केंद्र सरकारने गव्हाला *निर्यात बंदी* घातली व दर पाडले.

4. उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळावा व शहरातील लाडवलेल्या ग्राहकांच्या लांगूनचालनासाठी हे केले.

5. काही राज्यांमध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्याकडील 30 लाख टन गहु 2150 रुपये प्रति क्विंटलने विक्रीसाठी बाजारामध्ये आणला आहे. त्यामुळे गव्हाचे दर 500 रुपयांनी कोसळले.

6. सेबीने गव्हा सकट इतर आठ शेतमालांवर *वायदे बंदी* करून अजून भाव पाडले.

7.  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत होणाऱ्या व्यवहारांमध्ये *कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार* होत आहे. त्यामुळेही शेतमालाचे भाव निच्चांकी होतात. 

8. दुर्दैव असे की विरोधी पक्षही महागाई विरुद्ध आंदोलन करताना शेतमालाच्या भावाबद्दल बोलत असतात.

9. *तुमची महागाईची परिभाषा आहे तरी काय?*
 सन 1973 मध्ये डिझेल 84 पैसे प्रती लिटर असताना गव्हु एक रुपया प्रति किलो होता. म्हणजे डिझेलचे भाव 16% नी कमी होते. आज डिझेल 100 रुपये असताना गव्हाचा हमी भाव  21.25 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच आज डिझेलचे भाव गव्हाच्या तुलनेत जवळपास पाचपट पटीने वाढले आहेत. 






*कुठे आहे शेतमालाची महागाई?*

सतीश देशमुख, B.E. (Mech), पुणे                                          अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स                    9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_________________________________________________



संपादकीय,

"जय जवान जय किसान" भारताचे माजी पंतप्रधान शास्त्रीजींनी हा नारा दिला होता.. त्या कालखंडात संपूर्ण देशभर प्राणाची बाजू लाऊन लढणाऱ्या जवानांसाठी व अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा संदेश फार महत्त्वाचा आणि किमतीचा होता... अलीकडच्या काळामध्ये बरीच सरकारे आली.. गेली व कार्यरत आहेत मात्र या सरकारकडून आपली जीवाची बाजी लावणारे जवान व शेतकरी यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे ...आमचे मित्र सतीश देशमुख यांनी वरील लेख लिहिताना गव्हाच्या दराचे व शेतकऱ्यांच्या विवांचना याच्याबद्दल माहिती दिली आहे ...असे हजारो शेतीतज्ञांनी वारंवार आपल्या लेखणीतून सरकारला बजावले आहे सांगितले आहे पण.... 


शेती मधून उत्पन्न आले तरच आपण जगणार आहोत..

 याची जाणीव वारंवार सरकारला करून दिलेली आहे मात्र सरकार मध्ये बसलेले हे सगळे  उद्योगपती व उद्योगांनाच प्राधान्य देत असल्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्याकडे कायम दुर्लक्ष झालेल् आहे ..शेतीमालाला भाव हमी देणे आज तागायत ह्या 70 वर्षात कोणत्याही सरकारला जमलेले नाही ...जर अन्नच नसेल तर काय मोबाईल, लोखंड किंवा प्लास्टिक,ऊस खाऊन माणसं जगणार आहेत का??  असाच सवाल एखाद्या लहान मुलाला जरी विचारला तर तो म्हणेल...अन्न धान्यच लागणार आहे ...

 अन्नदात्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे सरकार सरकारमध्ये बसलेले काय साध्य करू इच्छीतात हे त्यांना व त्यांच्या सरकारमध्ये बसलेल्या अति शहाण्या लोकांनाच माहित....

             सरकार हो जागे व्हा  ...
शेतकरी राजा जगला तर हे जग जगणार आहे... शेतकऱ्यांसाठी बऱ्याच संघटना काम करत असतात ...करतात ...मात्र त्या देखील  कालांतराने प्रस्थापित सरकारांच्या वळचणीला  जाऊन बसून त्यामध्ये सामील होऊन परत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम या संघटनांनी केलेल आहे.. "सरकार हो जागे व्हा " शेतकऱ्यांच्यासाठी चांगल्या योजनां आणा... त्यांना चांगल्या उत्पन्नाची हमी द्या... त्यांना जगू द्या ते जगले तर आपण जगणार आहोत ...नाहीतर कागद ,प्लास्टिक , लोखंड व ऊस हे खाऊन काय माणूस जगू शकत नाही याचं भान सरकारला असावे

माकडाच्या हातात कोलीत दिल्यानंतर काय प्रकार होतो .. हे आम्ही सत्तर वर्षांत पाहिलेल आहे.. त्यांच्या लेखी शेतकरी  दुर्लक्षित प्राणी राहिलेला आहे.. आणि आज देखील आहे ...जरा लक्ष द्या. . शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगली मोठी योजना आणा... केंद्र सरकार व  राज्य सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावे ...नाहीतर एक दिवस आपली अवस्था पाकिस्तान व श्रीलंकेसारखी होऊन जाईल .. देश अन्नाला "मौताद" होऊन बसेल आणि शेतकरी व जनता रस्त्यावर येईल त्यावेळी या सरकार म्हणणाऱ्यांची पळता भुई  थोडी होईल.. असो..

 सलीम नदाफ :संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली..
8830247886