जर एखाद्या समाजाला गुलाम करायच असेल तर त्या समाजाचा इतिहास मिटवून टाकावा !

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जर एखाद्या समाजाला गुलाम करायच असेल तर त्या समाजाचा इतिहास मिटवून टाकावा !




          येणारी पिढी गुलाम करू नका....

नेहमी एक वाक्य बोलल् जात की,
जर एखाद्या समाजाला गुलाम करायच असेल तर त्या समाजाचा इतिहास मिटवून टाकावा ! आणि जर ते करता येत नसेल तर त्या समाजाचे संत महापुरुष यांचे दैवीकरण करा, त्याचा देव बनवा, त्यांच मंदिर बांधा, त्यांच्या आरत्या करा,! मागील काही वर्षात बहुजन समाज जागृत व्हायला लागला,त्या त्या समाजाने आपले आदर्श करून त्यांच्या जयंत्या, स्मृतिदिन करने त्यांना अभिवादन करणं सुरु केल, त्यातच समाज सुशिक्षित झाला... त्यामुळे त्यांचा इतिहास मिटवणं सोपं नाही म्हणून आता त्या महापुरुषांच्या आरत्या आणि मंदिर बांधणार, मंदिर बांधलं कि त्यांचं दैवीकरण होणार, मग रोज आरती, पूजा सुरु त्यामुळे त्यांचे विचार डोक्यात येण्याची शक्यता नाही, ज्या गाडगे बाबांनी "*देवळात देव नसते, तथी फक्त पुजार्यांच पोट असते*" असं पोट तिडकीन सांगितलं त्या गाडगेबाबाच मंदिर बांधून त्यांचं दैवीकरण केल गेलं..प्रत्येक गावात महादेव, हनुमान/मारोती मंदिर असतेच,त्यात भर असते ती मेकसा माय, मरी माय, वाघमाय, आता गावात तेली असतील तर संताजी मंदिर, बंजारा असतील तर सेवालाल, परिट असतील तर गाडगेबाबा, माळी असतील ते महात्मा फुले असें जाती जातीतील वाटले गेलेले संत त्यांची मंदिर उभे करतील ..मागील काही दिवसात एक गोष्ट नमूद केली असेल कि शिवरायांची आरती करने सुरु केल, असंच आता गाडगे बाबा,जगद्गुरू तुकाराम महाराज इत्यादी संत आणि महापुरुषांच्या आरत्या करणं सुरु केल आहे, ज्या शिवरायांनी कधी मुहूर्त पाहिला नाही, होमवन,यज्ञ केला त्याच शिवरायची आरती करणं म्हणजे त्यांच्या विचाराची हत्या करणं !!

कॉलोम्बीया विदयापीठात असतांना एकदा फळ्यावर एक वाक्य लिहिले होतं "*महापुरुष कधीच मरत नाहीत*"


डॉ बाबासाहेब त्यावेळी तिथे शिकत होते त्यांनी त्या खाली लिहीलं "*महापुरुष मरतात, जर त्यांचे विचार मारले तर* "



आता विचार मारण्यासाठी इतिहास मिटवता येत नाही म्हणून त्यांच दैवीकरणं करणं सुरु आहे, जर महापुरुषांचे आणि त्यांच्या विचाराचे हत्यारे व्हायचं नसेल तर त्यांचे दैवीकरण थांबवा !त्यांचे मंदिर बांधू नका,आरत्या करू नका ,अन्यथा येणारी पिढी मुकी आणि बहिरी होऊन जाईल, आता मुकी आणि बहिरी कशी तर एकदा दैवीकरण झाले कि तुम्ही त्या महापुरुष आणि संत यांचे विचार सांगू शकणार नाही, आणि जे उरले सुरले सांगतील तर ते ऐकणार नाही त्यामुळे मुकी आणि बहिरे लोकांना गुलाम करणं सोपं जात म्हणून विचार करा, आज काही संस्था, सन्घटना यासाठी कार्यरत आहेत येणारी पिढी जर गुलाम करायची नसेल तर कुणीतरी विरोध करायला पाहिजे, पुढाकार घ्यायला पाहिजे "*देखवेना डोळा ऐसा हा आकांत, म्हणून कळवळा येत असें* "आज समाजाची होतं असलेली दिशाभूल, धर्म आणि जातीच्या नावाखाली फसवणूक, लुबाडणूक थांवली पाहिजे म्हणून माझा हा छोटाचा प्रयत्न...

"*सत्य सांगे लोका, जरी कडू लागे, चालु लागे मागे कोण आला* "
राम नाखले -7588090666
(नावासह पोस्ट फॉरवर्ड करायला परवानगी ची गरज नाही )

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
___________________________________________________

संपादकीय. 
"माझा भारत महान" या महान भारतामध्ये अठरापगड जाती व धर्म सुखा समाधानानी व गोविंदाने नांदत आहेत.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश आज तरी शाबूत दिसत आहे.. परंतु या देशाला गुलामीकडे नेण्याच्या पद्धतशिर प्रयत्न काही संघटना, काही पक्ष व काही व्यक्तीकडून नेहमी होत आलेला आहे ,होत राहणार आहे....



त्याचं कारण असं आहे की, ज्या देशांमध्ये लोकशाही शाबूत आहे.. त्या संविधानाला जर फाटा द्यायचा असेल तर स्वतःला बुद्धीजीवी म्हणतात त्यांनी या देशावर दहा-पंधरा वर्षांमध्ये पद्धतशीर जनतेला गुलाम बनवण्याचे ठरवलेल आहे... संविदनाला फाटा देणे.. त्याच्यातून समोरच्या बहुजन समाजाला गुलाम बनवले हे फार सोपे आहे... त्याच्यासाठी काहीही न करता त्याच्या डोक्यात फक्त "देव धर्म" याची सांगड घालून त्याला आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याची दीक्षा दिली की, तो आपोआप पंगू होऊन गुलाम होतो



"धर्म अफूची गोळी आहे "असे म्हटले जाते.. आता हा अफू पद्धतशीर समाजाच्या डोक्यात पेरला जात आहे..
त्यामध्ये धर्मपंथ याचं आक्रमकतेने आचरण करणे याच्यावर जोर दिला जातो ,त्यानंतर जनतेला दुसरे कोणतेही विचार करण्याची संधी दिली जात नाही .

 हिरोशिमा आणि नागासाकी वर बॉम्ब हल्ला झाला त्या वेळेस सर्व जपानने पाच वर्षात "फिनिक्स" पक्षाप्रमाणे आपली प्रगती केली त्यांनी फक्त आपला देश आणि देशच असा विचार केला व जपान एक "जागतिक ब्रँड" म्हणून उभारीस आला.. पण आमचं दुर्दैव आहे आम्ही धर्म जाती पंथ याच्यामध्ये गुरफटून गेलेलो आहोत.. 

राजकारण्यांना व काही संस्थांना समोरची जनता याच्यामध्येच उल्लू बनून गुरफटून राहिली पाहिजे अशी पद्धतशीर योजना त्यांनी आपल्या देशात केलेली आहे


  याचं पहिलं उदाहरण म्हणजे बहुजनांची मुलं शैक्षणिक पात्रतेत उच्च होण्यास सुरुवात झाली होती ..त्यामुळे तेच नोकऱ्यांमध्ये ,उद्योगांमध्ये अग्रेसर ठरू लागले होते त्याच्यासाठी या यंत्रणेने त्याच्या हातात व्यवस्थितपणे फ्री मध्ये  "चक्क फुकट मोबाईल" दिला व त्याची सवय लावली त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष न देता ही मुलं या मोबाईलमध्ये गुरफटून गेली.. व ते गुलामगिरीकडे वाटचाल करू लागले..



त्यानंतर राजकर्त्यांनी व बुद्धिजीवांनी हा बहुजन समाज पुढे येतो आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांनी संविधानांची कड धरत "दारूबंदी"असताना व्यवस्थित दारू या समाजासाठी दारूची पिपे व बाटल्या मोकळ्या केल्या.. आणि ही पिढी नशेबाज होण्यास प्रारंभ झाला



तिसरं म्हणजे आता संपूर्ण भारताला गुलामगिरीत लोटण्याचं नवीन षडयंत्र येत आहे म्हणजे... "चलो खाना हुआ आप कुछ रमी खेलेंगे"  असा एक प्रकार आता संपूर्ण भारतामध्ये रुजवला जात आहे ...आणि त्याच्यामध्ये हा बहुजन समाज ,आडगा समाज गुंतवला जात आहे ....हे सर्व पद्धतशीरपणे षडयंत्र म्हणून सुरू आहे ..परंतु आपल्या बहुजनांना हे सगळं समजण्यासाठी अजून शंभर वर्ष तरी लागतील असा माझा अंदाज आहे...

आत्ताच जागे व्हा !! वेळेला किंमत द्या !! आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवा!!  आणि आपल्यावर लादलेली  गुलामगिरी झिडकारून टाका...

सलीम नदाफ 
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली
8830247886