अमित राज ठाकरेंचे सांगलीमध्ये भव्य स्वागत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अमित राज ठाकरेंचे सांगलीमध्ये भव्य स्वागत

 

 
       लोकसंदेश न्यूज नेटवर्क

      अमित राज ठाकरेंचे सांगलीमध्ये भव्य स्वागत

  सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष  अमित राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आज ते सांगलीमध्ये आले असता त्यांचे सांगली नगरीत सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले त्यावेळी त्यांचा सत्कार सांगली शहर अध्यक्ष मनसे श्री दयानंद मलपे यांनी केले त्यावेळी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यानिमित्ताने ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आणि विविध ठिकाणी संपर्क कार्यालयांचे त्यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. 


     मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत अमित ठाकरे दोन दिवस दौऱ्यावर आले होते. इस्लामपूर येथील तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, आष्टा शहराध्यक्ष राजकुमार सावळवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.  डिग्रज येथे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख कृष्णा मोहिते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊस येथे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दुपारी तीनला सांगली शहर-जिल्हाध्यक्ष दयानंद मलपे व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पराज चौक, तर जिल्हा उपप्रमुख संदीप टेंगले यांच्या वतीने


 अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांचे स्वागत केले. दुपारी साडेतीनला मिरज येथे मनसे जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे उद्‌घाटन, साडेचारला तासगाव तालुका मनसे संपर्क कार्यालयास भेट, सायंकाळी ५ ला तासगाव येथे अमोल काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. 
 विटा येथे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांचे संपर्क कार्यालय व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालमीस भेट दिल्यानंतर. सायंकाळी  टेलिकॉम सेनेचे जिल्हाप्रमुख संग्राम पाटणकर नागज येथे ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली