प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

सांगली दि. 3 :  आजची पिढी ही अधिक चिकित्सक असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगावी, असा सल्ला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना दिला.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग व  विज्ञान व गणित अध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड एमआयडीसी येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक येथे आयोजित ५० व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य आण्णासाहेब गाजी, सुहास पाटील, भालचंद्र पाटील, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी शालेय, तालुका व जिल्हा स्तरावर भरवण्यात येणारी विज्ञान प्रदर्शने प्रेरणादायी आहेत. लठ्ठे पॉलीटेक्निक येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या सांगली जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून देशासाठी भावी संशोधक व वैज्ञानिक निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये लहान वयापासूनच वैज्ञानिक ज्ञानाबाबत रूची निर्माण करण्यासाठी लठ्ठे पॉलिटेक्निक येथे सुंदर विज्ञान प्रदर्शन भरवले याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी अनुदान बंद केले नसून याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवावा त्याचा पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.


५० वे विज्ञान प्रदर्शन लठ्ठे पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्याचा बहुमान दिल्याबदद्ल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. यापुढेही शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला. 

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. लोंढे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. मुलांमध्ये वैज्ञानिक चिकित्सा व संशोधन वृत्ती वाढावी यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. जिल्ह्यात 758 हायस्कूल असून यामध्ये दोन लाखाच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना बाल वयातच विज्ञानाची गोडी लागून त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सायन्स क्लबची स्थापना करण्यात येणार असून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी  सायन्स सेंटर  व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विज्ञान शिक्षक दादासाहेब सरगर यांनी विज्ञान प्रदर्शनासंदर्भात माहिती देऊन प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या विज्ञान उपक्रमाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
50 व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी कृती या गटात इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या विश्वप्रतापसिंग रामराजे माने यास प्रथम क्रमांक, शांतिनिकेतन कन्या शाळा सांगली येथील वैष्णवी आनंदा मोरे द्वितीय,  येलूर हायस्कूल येलूरची वेदिका रत्नाकर जाधव तृतीय आणि कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूरची मधुरा मनोज कोरडे व पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हायस्कूल पलूसचे श्रेयस जगन्नाथ जाधव यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
प्राथमिक शिक्षक कृती गटात जिल्हा परिषद शाळा, आराळा येथील  शिक्षक मोहन राजाराम पवार प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा कारजनगे येथील शिक्षक श्रीकांत शंकर सोनार द्वितीय, जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर करगणी येथील शिक्षक दिपाली आनंद देवकर तृतीय आणि जिल्हा परिषद शाळा नं. २,  कुची येथील शिक्षक अमोल किसन हंकारे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
माध्यमिक विद्यार्थी कृती गटात जिजामाता विद्यालय वाळवा येथील श्रुती गजानन माळी प्रथम क्रमांक, एस. व्ही. एम. व्ही, कोळेगरी येथील प्रतीक्षा करबसप्पा हिरेमठ द्वितीय क्रमांक, शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली येथील आरती उमेश चव्हाण तृतीय क्रमांक आणि नचिकेता गौरवकुंज माध्यमिक विद्यालयाची ज्ञानेश्वरी संतोष माने व आझाद विद्यालय कासेगाव येथील ऋषिकेश राजेंद्र किरवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
माध्यमिक शिक्षक कृती गटात न्यू इंग्लिश स्कूल कोंगनोळी येथील शिक्षक संजयकुमार लालासो मगर प्रथम क्रमांक, समाज विकास विद्यालय, सांगाव येथील शिक्षक मंगेश विठ्ठल तिके द्वितीय क्रमांक, प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथील शिक्षक गीतांजली योगेश लुब्बाळ तृतीय क्रमांक आणि जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मिरज येथील शिक्षक परवीन मोहम्मद आरिफ बागवान यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
प्रयोगशाळा परिचर कृती गटात सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील अशोक गणपतराव पाटील प्रथम क्रमांक, विटा हायस्कूल विटा येथील मुलाणी परवेज मौलाअली द्वितीय क्रमांक,  बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल कवठेमहांकाळ येथील शहाजी पतंगराव दळवी तृतीय क्रमांक आणि समाज विकास विद्यालय सांगाव येथील आर. एच. कोरे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा या गटात नांद्रे विद्यालय व कला वाणिज्य विद्यालय  नांद्रे येथील श्रद्धा राजेंद्र तांदळे, श्रावणी आप्पासो यादव, समीक्षा संदीप पवार यांना प्रथम क्रमांक, सेकंडरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भिलवडी येथील सृष्टी दादा चौगुले, सानिका शब्बीर इनामदार, सुखदा धनंजय भोळे यांना द्वितीय क्रमांक आणि महात्मा गांधी विद्यालय विटा येथील साद रफिक तांबोळी, अथर्व दीपक मुतालिक, विराज सूर्यकांत कदम यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. 
दिव्यांग विद्यार्थी कृती गटात भीमरावशेठ जगन्नाथ चव्हाण-देशमुख विद्यालय वासुंबे ता. खानापूर येथील विराज संजय पवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...


त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
          
             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________