टाटा नॅनोने महिंद्रा थारला दिली धोबीपछाड, विचित्र अपघाताची नेटकऱ्यांनी उडवली थट्टा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

टाटा नॅनोने महिंद्रा थारला दिली धोबीपछाड, विचित्र अपघाताची नेटकऱ्यांनी उडवली थट्टा...
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

टाटा नॅनोने महिंद्रा थारला दिली धोबीपछाड, विचित्र अपघाताची नेटकऱ्यांनी उडवली थट्टामहिंद्रा थार ही हिंदुस्थानातील मजबूत कारपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही गाडी तिच्या गँगस्टर आणि मस्क्युलर लुकमुळे रस्त्यावर चालताना सर्वात हटके वाटते. मोठी चाकं, पावरफुल इंजिन आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे आपण या गाडीमध्ये ऑफरोडिंगही करू शकतो.इतर गाड्या थारला धडकल्यानंतर त्या गाड्यांची अवस्था बिघडते. मात्र नुकताच महिंद्रा थार आणि टाटा नॅनो यांचा एक अपघात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

छत्तीसगडच्या दुर्गमध्ये महिंद्रा थार आणि टाटा नॅनो यांच्यात अपघात झाला. मात्र दोन्ही गाड्यांच्या अपघातानंतर महिंद्रा थारची जी अवस्था झाली ते पाहून सर्वांना धक्काच बसला. हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त कार अशी टाटा नॅनोची ओळख आहे. मात्र कॉम्पॅक्ट डिझाइन आणि लूकमुळे तिची अनेकदा थट्टा उडवली जाते. मात्र महिंद्रा थार टाटा नॅनोला धडकल्यानंतर थेट उलटली. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये रस्त्यावर उलटलेली थार पाहिल्यानंतर दोन्ही गाड्यां मधील मजबूत गाडी कोणती हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार वेगात एक जंक्शन ओलांडत असताना पलीकडून टाटा नॅनो आली आणि थारला धडकली. या धडकेत थार जागीच उलटली. या अपघातात टाटा नॅनोचे थोडे नुकसान झाले मात्र ती चारही चाकांवर उभी होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

'सेफ कार्स फॉर इंडिया' उपक्रमांतर्गत, ग्लोबल NCAP ने महिंद्रा थारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान केले आहे. या SUV ने प्रौढांच्या सेफ्टीमध्ये 17 पैकी 12.52 गुण मिळवले आणि लहान मुलांच्या संरक्षणात 49 पैकी 41.11 गुण मिळवले आहेत. मात्र असे असूनही थार पलटली कशी असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

        कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT. LTD.

MUMBAI.

सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.

कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________