निवडणूक आयोग मोदींचा गुलाम, आयोगाचा खोटारडेपणा उघड करणारच, मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंचा हजारो शिवसैनिकांशी संवाद, म्हणाले गद्दारांना....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम, आयोगाचा खोटारडेपणा उघड करणारच, मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंचा हजारो शिवसैनिकांशी संवाद, म्हणाले गद्दारांना....
निवडणूक आयोग मोदींचा गुलाम, आयोगाचा खोटारडेपणा उघड करणारच, मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंचा हजारो शिवसैनिकांशी संवाद, म्हणाले गद्दारांना.........मी खचलो नाही, खचणार नाही, असंही यावेळी उद्धव टाकरे म्हणाले आहेत. हा निर्णय घेऊन आयोगानं आणि भाजपानं मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्याचं ते म्हणाले आहेत.*मुंबई- शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला देणारा निवडणूक आयोग हा पंतप्रदान मोदींचा गुलाम असल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा उघडा करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाच्या सर्व बाबींची पूर्तता केली होती. त्याबाबत लवकरच शिवसैनिकांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असल्याचं त्यांनी म्हटलय. चौरांना अद्दल घडवल्याशिवाय थांबणार नाही, गद्दारांना गाडल्याशिवाय थांबणार नाही,असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावेळी हजारोंच्या गर्दीत उघड्या जीपमध्ये उभं राहून उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.*खचलो नाही, खचणार नाही- उद्धव ठाकरे*

मी खचलो नाही, खचणार नाही, असंही यावेळी उद्धव टाकरे म्हणाले आहेत. हा निर्णय घेऊन आयोगानं आणि भाजपानं मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्याचं ते म्हणाले आहेत. खरी शिवसेना कुणाची, हे यांना दाखवून द्यायची वेळ आली आहे, असंगी उद्धव ठाकरे म्हणालेत. मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घेऊन महाराष्ट्रात यावं लागत असल्याचं ते म्हणाले. मोदींच्या नावानं त्यावेळी मते घेतली हा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.

          *निवडणुकीच्या तयारीला लागा*

मर्द असाल तर तुम्ही धनुष्य बाण घेऊन मैदानात उतरा, आम्ही मशाल घेऊन मैदानात उतरतो. तुम्हा गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या सगळ्यांना गाडून त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा भगवा गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिलेत. गद्दारांना धनुष्यबाण पेलणार नाही, तो त्यांच्या बोकांडी पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. कुणाच्या कितीही पिढ्या उलटल्या तरी शिवसेना संपवू शकणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली