MUMBAI: शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच..”

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI: शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच..”लोकसंदेश न्यूज नेटवर्क

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच..”


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर त्यांनी खेद व्यक्त केला.


“मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?”

सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, “या देशामधील सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातलेच हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग कुणाचे तरी गुलाम असल्यासारखे वाटत आहे. या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ. पण ४० बाजारबुणगे पैशांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेऊ शकत असतील तर देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल.”

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली