SANGLI "सहकारतपस्वी गुलाबराव पाटील" चौक नामकरण व सुशोभिकरणामुळे मार्केट यार्डाला आले नवे रंगरूप....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI "सहकारतपस्वी गुलाबराव पाटील" चौक नामकरण व सुशोभिकरणामुळे मार्केट यार्डाला आले नवे रंगरूप....
SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी

"सहकारतपस्वी गुलाबराव पाटील" चौक नामकरण व
सुशोभिकरणामुळे
मार्केट यार्डाला आले नवे रंगरूप....

सांगली, दि. २२ : सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने येथील मार्केट यार्ड चौकाला सहकारतपस्वी गुलाबराव पाटील चौक असे नाव देण्यात आले. या चौकात खूप छान आयलँड उभा करण्यात आला आहे, या ठिकाणच्या रस्त्याचे कामही झाले आहे. सुशोभीकरणामुळे या चौकाला चांगले रंगरूप आले आहे.सांगली - मिरज या प्रमुख मार्गावरील आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मार्केट यार्ड चौकाचे "सहकारतपस्वी गुलाबराव पाटील चौक" असे नामकरण आणि सुशोभिकरणाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.


यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार एच. के. पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयंत पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज, अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली

--