SANGLI महानगरपालिकेवर २८ रोजी कामगार सभेचा मोर्चा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI महानगरपालिकेवर २८ रोजी कामगार सभेचा मोर्चा...



लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

SANGLI
महानगरपालिकेवर २८ रोजी कामगार सभेचा मोर्चा...

कामगारांना महानगरपालिका सेवेत कायम करा, भरतीस परवानगी दिलेल्या ५८६ रिक्त पदांवर मानधनी, बदली, रोजंदारी कामगारांची सेवाजेष्ठनुसार नेमणूक द्या व अन्य मागण्यांसाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता स्टेशन चौकातून महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, सहसचिव विजय तांबडे यांनी दिली.


 बदली, मानधनी कामगारांना सेवेत कायम करा; ५८६ पदांवर नेमणुकीची मागणी...
न्यायालयात दाद मागू : तांबडे

महानगरपालिकेने पाठविलेला आकृतीबंध शासनाने मंजूर केलेला आहे. आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचारी व वाहनचालक कर्मचारी यांना शासनाने आकृतीबंधामध्ये नाकारलेले आहे. ही शासनाची कृती चुकीची आहे. साफसफाई कर्मचारी व वाहनचालक यांचा समावेश आकृतीबंधामध्ये करण्यासाठी नव्याने प्रस्ताव पाठवावा. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा कामगार सभेचे सहसचिव तांबडे यांनी दिला आहे.

महापालिकेतून
पंधराशेहून अधिक आहे.

मानधनी, बदली व रोजंदारी कामगारांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचा ठराव दि. १९ ऑक्टोबर २०२२ च्या महासभेत झाला आहे. हा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवलेला नाही. हा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवावा. नगरविकास खात्याने दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मानधनी, रोजंदारी कामगारांची संख्या करण्यात आली.

आकृतीबंधानुसार शासनाने मंजूर ५८६ रिक्त पदे भरण्यास परवानगी केलेल्या १ हजार ११४ पदांवर व उर्वरित रिक्त २८८ पदांवर महापालिकेकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या मानधनी, बदली व रोजंदारी कामगारांमधूनच नेमणूक देण्यास शासनाची मंजुरी घ्यावी, अशी मागणी
दिलेली आहे. या ५८६ रिक्त पदांवर मानधन, बदली, रोजंदारी कामगारांची सेवाजेष्ठनुसार नेमणूक करावी, अशी मागणी पाटील व तांबडे यांनी केली आहे यावेळी  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली