राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करणेसाठी विराट मोर्चाचे आयोजन - पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करणेसाठी विराट मोर्चाचे आयोजन - पृथ्वीराज पाटीललोकसंदेश न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करणेसाठी विराट मोर्चाचे आयोजन - पृथ्वीराज पाटील.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाने नवी पेन्शन योजना लागू केली. सन २००३ मध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा जगण्याचा आधारच काढून घेऊन अमानुष अन्याय केला आहे. राज्यभर या विषयावर मोठा असंतोष निर्माण झाला आहे.  ही योजना केवळ दरमहा तीन ते पाच हजार पेन्शन देणारी आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जगण्याची शाश्वतीच शासनाने काढून घेतली. गेली १७ वर्षे कर्मचारी संघर्ष करीत आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाने अद्याप जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला नाही. पंजाब, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश व छत्तीसगड राज्यांनी जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ती तातडीने लागू करण्याचा निर्णय घ्यावा यासाठी कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, १७ वर्षापूर्वी या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू झाली आणि शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. उभी हयात नोकरी करुन त्यांना जर अडीच तीन हजार पेन्शन मिळत असेल तर ती त्यांची चेष्टाच आहे. जुन्या पेन्शन योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर चांगला आधार मिळत होता. हा आधारच काढून घेतल्याने त्यांचे संसार अडचणीत आले. 
त्याअनुशंघाने सांगली जिल्ह्य़ातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा विविध 225 संघटनांच्या सहकार्याने रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी आयोजित केला आहे. मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. स. १०.०० वा. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकातून अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरू होईल. जिल्हा परिषद, राममंदिर चौक, काँग्रेस भवन, स्टेशन चौक मार्गे राजवाडा चौक असा मोर्चाचा मार्ग राहील. मोर्चाचे रूपांतर स्टेशन चौक, सांगली येथे सभेत होऊन मोर्चाचा समारोप होईल. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना संघटीत समितीच्या वतीने निवेदन देण्यात येईल.  या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० हजार शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार आहेत. माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, जिल्ह्यातील महाआघाडीचे पक्ष नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत मोर्चा निमंत्रक पृथ्वीराज पाटील यांनी दिली. ते म्हणाले, हा मोर्चा भव्य दिव्य स्वरुपात सांगलीत संपन्न होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटना, राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद लिपीक वर्ग कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, शिक्षक समिती संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षक भारती संघटना, खाजगी शिक्षक परिषद, शिक्षक संघ, नर्सेस फेडरेशन संघटना, कास्ट्राईब महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना आदि संघटना पदाधिकारी यांनी मोठी संपर्क यंत्रणा राबवली आहे. या सांगली मोर्चाचा आवाज विधिमंडळाच्या अधिवेशनात नक्कीच घुमणार आहे.   सांगली जिल्हा संस्था चालक संघटनेने या मोर्चास पाठींबा दिला आहे व सर्व खाजगी संस्था व त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी होणार आहेत.

यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे, अमोल शिंदे, मुलाणी, राजेंद्र नागरगोजे, सागर बाबर, अमोल माने, रवी अर्जुने, संजय व्हनमाने, पी. एन. काळे, संजय व्हनमाने आदि उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.