Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत २० हजाराहून अधिक कर्मचा-यांचा विराट मोर्चा..... शासनाला जूनी पेन्शन लागू करण्यास भाग पाडू....पृथ्वीराज पाटील



लोकसंदेश न्यूज़ प्रतिनिधि

सांगलीत २० हजाराहून अधिक कर्मचा-यांचा विराट मोर्चा.....
शासनाला जूनी पेन्शन लागू करण्यास भाग पाडू.....
पृथ्वीराज पाटील

सांगली दि. १२ मार्च, २०२३: सेवानिवृत्तीनंतर कर्मचा-यांना सन्मानाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजनाच हवी.तुटपुंज्या नव्या पेन्शन मुळे कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत.


सन २००३ मध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी सरकारने हा अन्यायकारक निर्णय देशावर लादला. गेली १७ वर्ष शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत. आता महाराष्ट्रात संगमनेर व कोल्हापुर येथे भव्य मोर्चाने तीव्र असंतोष व्यक्त झाला. आज सांगलीच्या विराट मोर्चात सुमारे २० हजाराहुन अधिक कर्मचारी सहकुटुंब मोर्चात सहभागी होऊन शासनाला नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी इशारा दिला आहे.  शासनाने तातडीने या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्याचा निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा असे, प्रतिपादन मोर्चा समन्वय समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पाटील यांनी केले.  ते आज जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विराट मोर्चासमोर बोलत होते.  ते पुढे म्हणाले, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड व हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस सरकार आल्यानंतर तातडीने जुनी पेन्शन योजना लागू केली.  या राज्यांचा जीडीपी कमी असूनही त्यांनी जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला



 महाराष्ट्राचा जीडीपी चांगला आहे.  त्यामुळे महाराष्ट्र राज्याने जुनी पेन्शन लागू केलीच पाहीजे.  राज्यभर कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदतोय, १४मार्च,२०२३ पासून राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत.  ही बाब शासनाला भूषणावह  नाही.   कर्मचारी हा राज्याचा कणा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करुन तो संतुष्ठ व भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे.  हे जर शासनाने केले नाही तर, हा मोर्चा केवळ ट्रेलर आहे.२०२४ का पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणताच प्रचंड टाळयांचा कडकडाट होऊन परिवर्तनाचा इशाराच मोर्चेक-यांनी दिल्याची चर्चा आहे. जुन्या पेन्शनमुळे आर्थिक भार वाढतो हा मुद्दा पृथ्वीराज पाटील यांनी खोडून काढला.जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची शासनाची राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही हे दुर्दैव आहे असेही ते म्हणाले. 



यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अरूण लाड, माजी महापौर सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी आमदार भगवान साळुंखे, रोहित पाटील, पी. एन. काळे, अरूण खरमाटे, प्रा. एन. डी. बिरनाळे, बाबा लाड, अमोल शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संपूर्ण पाठिंबा जाहीर करुन जोरदार पाठपुरावा करु असे सांगितले. . प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. जैनापुरे यांनी आभार मानले.

सकाळी १०वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जुनी पेन्शन न्याय मागणी आहे. ती लागू होण्यासाठी आम्ही जोरात पाठपुरावा करू असे सांगितले. मोर्चा कर्मवीर पुतळा -जिल्हा परिषद- राममंदीर चौक – कॉंग्रेसभवन - स्टेशन चौक ते राजवाडा या मार्गे संपन्न झाला.  मोर्चाचे पहिले टोक राजवाडा चौक व शेवटचे टोक कर्मवीर पुतळ्याजवळ एवढ्या प्रदिर्घ अंतरावर रस्त्यात मोर्चेक-यांची तुडुंब गर्दी होती. कर्मचाऱ्यांचा जनसागर पाहून सांगलीकर अवाक झाले होते. सांगली शहरात असा विराट मोर्चा अद्याप झाला नव्हता.  असे जुने जाणकार मंडळी बोलत होते.  
गेली महिनाभर पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयातुन पृथ्वीराजबाबा हे नियोजन सुत्रे हलवत होते.  मोर्चात एकच मिशन - जुनी पेन्शन मजकुराच्या हजारो टोप्या घातलेले कर्मचारी भर ऊन्हात जुनी पेन्शन संदर्भात असंख्य घोषवाक्यांचे फलक घेऊन शासनास इशारे देत होते. सभास्थानी स्टेज व बैठक व्यवस्था, पाण्याची उपलब्धी व्यवस्था चोख होती.  प्राथमिक उपचार सेवेसाठी दोन व्हॅन सज्ज होत्या. 
हा अभुतपुर्व मोर्चा यशस्वी व दखलपात्र झाला. यामध्ये विविध शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या संघटनांचे राज्य विभाग, जिल्हा व स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे निवेदन निमंत्रक पृथ्वीराज पाटील, आ. विक्रम सावंत, अमोल शिंदे, प्रा. एन. डी. बिरनाळे, राजेंद्र नागरगोजे, अरविंद जैनापुरे यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्याकडे दिले.सांगलीत एवढा भव्य मोर्चा पहिल्यांदाच निघाला आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_________________________________________________________

           या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली, रत्नागिरी व कोकण... 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील आंबा, काजू, काळीमिरी व इतर सर्व पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...




त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
      
संपूर्ण कोकण परिसरामध्ये आपल्या शेतजमिनी योग्य दरात खरेदी करणारी एकमेव कंपनी..
त्वरित संपर्क करा..   
             www.nisargbhumi.com

                   9850155823

                   8830247886
____________________________________________________________________________________