अल्पसंख्यांवरील अन्यायासाठी जातीयवादी पक्षांसह धर्मनिरपेक्ष पक्ष जबाबदार - इकबाल अन्सारी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अल्पसंख्यांवरील अन्यायासाठी जातीयवादी पक्षांसह धर्मनिरपेक्ष पक्ष जबाबदार - इकबाल अन्सारी




लोकसंदेश न्यूज़ प्रतिनिधि

अल्पसंख्यांवरील अन्यायासाठी जातीयवादी पक्षांसह धर्मनिरपेक्ष पक्ष जबाबदार - इकबाल अन्सारी.


भारताच्या स्वातंत्र्य पासूम महासत्ता बनविण्याच्या विचारांपर्यंत सर्वच पातळीवर मुस्लिम समाज आपले बहुमोल योगदान देत आला आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुस्लिम समाजाचा विकास करण्याचे तर दूरच मुस्लिमांवर अन्याय वाढला आहे आणि अन्याय करणारे सत्ताधारी जातीयवादी पक्षाशी संबंध दाखवत असताना धर्म निरपेक्ष विरोधक कोणताही विरोध न करता मुस्लिमांवरील अन्यायाचा तमाशा बघत बसून एकप्रकारे साथ देत आहेत असे उद्गार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत काढले.



सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कै बादशहा पाथरवट यांच्या मृत्यूनंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त असून पदासाठी अनेकांनी कंबर कसली आहे त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखती सांगली येथील हॉटेल अंबॅसिडर येथे आयोजित केल्या होत्या त्यावेळेस मार्गदर्शन करताना इकबाल अन्सारी यांनी पदाधिकारी यांना मरगळ झटकून समाजाच्या विकासाचे व्रत घेऊन कार्यरत होण्याचा सल्ला इकबाल अन्सारी यांनी दिला.
धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांना आपली बटीक समजून गृहीत धरित आहे व विकासासाठी बोलायचे तर सोडा उलट मुस्लिमांवरील होत असलेल्या अन्यायाला मूक संमती देत असून मूग गिळून गप्प बसत आहेत त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करून पुन्हा संघटनेचा नावलौकिक तयार करावा व एवढी ताकत निर्माण करूया की जातीयवादी पक्षांसह , धर्मनिरपेक्षतेच्या आडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्या पक्षांना धडा शिकवू शकू असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सादिकभाई शेख यांनी केले आहे.


समाजात व संघटनेत एकजूट असली तर समाज व संघटना सक्षम बनते व हेच बलशाली भारत घडविण्यासाठी महत्वाचे पाऊल असेल असे मत अमीन शेख यांनी व्यक्त केले . 
सूत्र संचालन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत यांनी केले तसेच एम एस गवंडी ,नाशिर शरीक मसलत, अय्युब बारागिर ,शाहीन मुल्ला यांनी मार्गदर्शन केले .
कबीर मुजावर , शहानवाज मुल्ला व सर्व पदाधिकारी यांनी नेटके आयोजन केले व श्री सोनवणे यांनी आभार मानले .

लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_______________________________________________________

संपादकीय,
भारतदेशाच्या स्वातंत्र्यामध्ये  सर्वात जास्त योगदान मुस्लिम समाजाचे आहे परंतु गेली 75 वर्षामधे मुस्लिम समाजात व्यवस्थित टार्गेट करून त्यांची अधोगती कशी होईल अशीच यंत्रणा काम करीत आहे... मग ती कोणत्याही पक्षाचे राज्य असो वा देशात केंद्रात  कोणताही पक्ष असो.. त्यामुळे मुस्लिम समाजाची अधोगतीसाठी हे सर्व पक्ष जबाबदार आहेत यांना फक्त आणि फक्त मताचे राजकारण करण्याच आहे  ..या राजकारणातून प्रत्येक पक्षाने एकेक मुस्लिम गट सांभाळलेला आहे... कोणी प्रोटेक्शनच्या नावावर.... आम्ही तुमच्या बाजूस आहोत... तर कोणी आम्ही तुम्हाला न्याय देऊ ....कोणी.. तुमच्या समाजासाठी आम्ही काही मोठे योगदान देऊ... अशा भूल थापा देऊन प्रत्येक पक्षाने मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, अथवा मग बीजेपी असो.. अथवा अन्य यांनी आपल्या पक्षांमध्ये प्रत्येक मुस्लिमास एक जागा देऊन मुस्लिम पक्ष व्यवस्थित फोडण्याचे काम करून यांच्या मतावर राज्य करण्याचे अवलंबलेले आहे... आता गेली 75 वर्षे झाली ही अधोगती मुस्लिम भोगत आहेत...

ज्या वेळेला केंद्र सरकारमध्ये काँग्रेस होतं त्यावेळेला सच्चर समिती ने ज्या सूचना केल्या होत्या त्याच्या एक टक्क्यावर ही काँग्रेस पक्षाने अवलंब केला नाही...

मुस्लिमांसाठी केंद्र सरकारच्या अथवा राज्याच्या कोणत्याही योजना, महामंडळ असो ,या योजना फक्त फसव्या आणि फसव्याच आहेत, त्यामुळे मुस्लिमांच्या मध्ये स्वतः हलकेफुलके काम करून जगण्याचे नशिबी आलेले आहे
मग तो रस्त्यावर बसून  फळे विकेल ,गाड्यांचे पंचर काढेल, मेकॅनिकल काम करेल, हमाली करेल, अशी बरीच जी अंग मेहनतीची कामे करून आज मुस्लिम समाज आपला उदरनिर्वाह करत आहे परंतु कुठल्याही पक्षाने त्याच्या शैक्षणिक त्याचे आर्थिक व त्याच्या प्रगतीसाठी काहीही केलेलं नाही..

त्यामुळे मुस्लिम समाजाने एकत्र येत आपला स्वतःचे एक वेगळ अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे. ही गोष्ट कितपत शक्य होईल हे फक्त "अल्लाह" जाणो ...

सलीम नदाफ :संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
8830247886