श्रीमती निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री यांना आमचे पत्र: महिलांच्या अदृश्य श्रमाचे जीडीपी- (GDP) 'सकल राष्ट्रीय उत्पादना' मध्ये समावेश करा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्रीमती निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री यांना आमचे पत्र: महिलांच्या अदृश्य श्रमाचे जीडीपी- (GDP) 'सकल राष्ट्रीय उत्पादना' मध्ये समावेश कराश्रीमती निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री यांना आमचे पत्र: महिलांच्या अदृश्य श्रमाचे जीडीपी- (GDP) 'सकल राष्ट्रीय उत्पादना' मध्ये समावेश करा.


आदरणीय महोदया,

आम्ही पुर्वी आयोजित केलेल्या महिला बचतगट प्रशिक्षणामध्ये, आम्ही मांडलेल्या एका मागणीचा येथे, जागतिक महिला दिना निमित्ताने, पुनरुच्चार करीत आहे. 

महिलांच्या अदृश्य श्रमाचे जीडीपी- (GDP) 'सकल राष्ट्रीय उत्पादना' मध्ये समावेश करा.

महिला आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र काबाडकष्ट (Unpaid Domestic Work- प्रती दिन 299 मिनीटे) करीत असतातच. तसेच शेती व पूरक व्यवसाय मधील कामांमध्ये त्यांचा 65%  सहभाग असतो. परंतु आपल्या अर्थतज्ज्ञांनी या अदृश्य श्रमाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले आहे.

5 जानेवारी 21 ला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायधीशांच्या समितीने, एका खटल्यामध्ये निकाल देताना, अशी आशा व्यक्त केली की 'केंद्र सरकारने देशातील गृहिणींच्या श्रमांचे अर्थ मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी'.

कीर्ती विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या एका प्रकरणात, न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा म्हणाले की गृहिणी काम करत नाहीत किंवा घरामध्ये आर्थिक मूल्य जोडत नाहीत ही संकल्पना "समस्यापूर्ण" कल्पना आहे जी अनेक वर्षांपासून कायम आहे आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे.

*हा निकाल सामाजिक समतेच्या घटनात्मक दृष्टिकोनातून व महिलांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. व हा दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक निकाल आहे असे आम्ही मानतो*.

अनुजाथ सिध्दुने वयाच्या दहाव्या वर्षी एक पेंटिंग काढले होते. शिर्षक होते 'My Mother and Mothers in my neighbourhood'. त्यात महिला किती विविध प्रकारची कामे करतात त्याचे चित्रण केले होते. या चित्रातून त्याची भावना प्रगट होते. या पेंटिंगला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. व केरळ सरकारने या चित्राची निवड 'Gender Budget Document' च्या मुखपृष्ठासाठी केली. सोबत चित्र जोडले आहे. पण हा सन्मान पाहायला त्याची आई जिवंत नव्हती.

*महिलांच्या कष्टाचे शास्त्रीय मोजमाप करून त्याची नोंद जीडीपी - सकल राष्ट्रीय उत्पादनात मध्ये करणे ही काळाची गरज आहे.*

आमचा ठाम विश्वास व अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या सूचनेचा विचार कराल, कारण एक स्त्री म्हणून तुम्हालाही असाच अनुभव आला असणार.

*असे झाल्यास भारताने जगासाठी प्रस्थापित केलेला हा नवा ट्रेंड व पायंडा असेल, ज्याचा इतर देश अनुकरण करतील.*

प्रतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
: पंतप्रधान व पीएमओ ऑफिस
: राष्ट्रपती, भारत सरकार 
सतीश देशमुख, B.E. (Mech), पुणे                                          अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स                    9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!
....................................

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.