पवित्र हज यात्रा 2023 साठी अल्पसंख्यांक मंत्रालय भारत सरकार व हज कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने डिजिटल रँडम सोडत जाहीर....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पवित्र हज यात्रा 2023 साठी अल्पसंख्यांक मंत्रालय भारत सरकार व हज कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने डिजिटल रँडम सोडत जाहीर....
लोकसंदेश प्रतिनिधी ,सांगली


पवित्र हज यात्रा 2023 साठी अल्पसंख्यांक मंत्रालय भारत सरकार व हज कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने डिजिटल रँडम सोडत जाहीर 


केली असून  यावर्षी  सांगली जिल्ह्यातून  414  ऑनलाइन अर्ज  सादर करण्यात आले होते  यातून  276  हज यात्रे करूंची निवड झाली आहे . या सर्व हजयात्रेकरूंचे अभिनंंदन करत हजयात्रा सफल व्हावी अश्या शुभेच्छा खिदमत हुज्जाज कमिटी सांगली यांचे वतीने देण्यात आल्या आहेत .


तसेच 138 अर्जदारांची प्रतीक्षा यादी मध्ये  नोंद झाली आहे,प्रतिक्षा यादीतील हज यात्रेकरूंची ऊपलब्ध होणार्‍या सीटस मधून निवड करण्यात येईल.तसेच निवड झालेल्या हजयात्रेकरुनी  दिनांक ०७/०४/२०२३पूर्वी  पहिला हप्ता रक्कम  81800/—(एक्याऐंशीहजार आठशे ) मात्र प्रत्येक हजयात्रेकरूची भरावयाची आहे  मुदतीत रक्कम भरणे गरजेचे आहे  अन्यथा आपली सीट रद्द होऊ शकते याची हज यात्रेकरुनी नोंद घ्यावी ...सदरची रक्कम हज कमिटीच्या पे ईन स्लिप द्वारे  स्टेट बँक ऑफ इंडिया  किंवा  युनियन बँक ऑफ इंडिया  च्या  कोणत्याही शाखेतून  कोर बँकींगने भरणा करावयाची आहे  हज कमिटीच्या वेबसाईटवरून  आपल्या सोयीच्या बँकेची  पे इन स्लिप ची प्रिंट घ्यावी  किंवा 

खिदमत हुज्जाज कमिटीच्या  सांगली येथील शंभर फुटी रोड हॉटेल शिवप्रसादजवळ  सांगली,

  येथील कार्यालयात उपलब्ध आहेत  या कार्यालयातून   आपणास  हज कमिटी ऑफ इंडियाची पे इन स्लिप  व मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट  चा नमुना  उपलब्ध केलेला आहे . सदरची रक्कम भरून  आपणास खालील प्रमाणे कागदपत्रे  महाराष्ट्र राज्य हज कमिटी,मुंबई येथे सादर करण्याचे आहेत . 
(१)भरणा केलेल्या रकमेची मूळ पावती,
(२)आपला मेडिकल व फिटनेस  दाखला,
(३)आपला ऑनलाईन  भरलेला हज  एप्लिकेशन्स             फॉर्म
(४) त्यासोबत जोडलेली कागदपत्रे
(५) ओरिजनल पासपोर्ट  व फोटो.


नेहमीप्रमाणे  आपल्या सर्वांच्या सोयीसाठी  आमचे कार्यालयाकडून  आपले कागदपत्र  महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई   येथे पोहोच करण्याची  मोफत व्यवस्था  करण्यात आली असून  आपले सर्व कागदपत्रे  दिनांक  8/4/2023  पर्यंत  आमच्या शंभर फुटी रोड सांगली येथील कार्यालयात पोहोच करावीत. व सर्व निवड झालेल्या हज यात्रे करूंनी याचा लाभ घ्यावा.
असे आवाहन  हाजी मुनीर अत्तार यांनी केले आहे . 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.