सांगली जिल्हा प्रतिनिधी
भारतीय ब्ल्यू पँथर च्या दणक्याने सांगली प्रशासनावरच कारवाई होणार
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल या गावी गेले ४० ते ५० वर्ष राहत असलेल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या कुटुंबीयावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी फासेपारधी समाजाला
पूर्व सूचना न देता सूर्य उगवण्याच्या आत समाज झोपेत असताना त्यांची झोपड्या वजा घरे जेसीबीने जमिनदोस्त करून त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंची राखरांगोळी करुन
एक प्रकारचा मानवी अत्याचार केला असून भारतीय ब्ल्यू पँथर चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नितिन गोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर आॅरगनायझेशन फाॅर राईट्स चे अध्यक्ष दिनेश पवार, सामाजिक कार्यकर्ते बबनजी गोरामन या नेत्यांच्या कडून
वरील प्रकरणाची वृत्तपत्र बातम्या व व्हिडिओ सह सविस्तर माहिती केंद्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे सत्वर पाठवली. त्या प्रकरणाची गंभीर दखल आयोगाने सांगली जिल्हा पोलिस प्रमुख,वन संरक्षक संचालक, सांगली जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून
झालेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत प्राप्त न झालेस राज्यघटनेच्या कलम ३३८(क) अन्वये कारवाई करणेची सूचना बजावली आहे. त्यामुळे *भारतीय ब्ल्यू पँथर* च्या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे,
असे आज
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गोंधळे
भारतीय ब्ल्यू पँथर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.